हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खडाजंगी उडाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर पलटवार करत टिपू सुलतान नामकरणा वरून भाजप लोकांची दिशाभूल करत आहे असं म्हंटल आहे.
नवाब मलिक म्हणाले, टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. याआधी २०१३ मध्ये भाजप नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतानच्या नामकरणा साठी पत्र लिहिले होते ही गोष्टही मलिक यांनी निदर्शनास आणून दिली.
टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते त्यांचा नावाचा विरोध करण्याचे काम भाजप करत आहे. pic.twitter.com/TI2Z6owxQn
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 27, 2022
मुंबईतील एका मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव दिले म्हणून त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. टिपू सुलतान यांच्या बाबतीत राष्ट्रपतीनी सभागृहात संबोधित करत असताना टिपू सुलतान यांच्याबद्दल काय सांगितले होते याची माहिती भाजपच्या नेत्यांनी घ्यावी असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला.