टीम, HELLO महाराष्ट्र । आजकाल पोटाचं तंत्र जपायला पुरेसा वेळ आणि शुद्ध खानपान नाही असे म्हणायला हरकत नाही . आणि जर पोट खराब असेंल तर कोणत्याही कामात लक्ष लागत नाही . त्यात खानपानाच्या चित्रविचित्र सवयी पोट दुखी सह मोठ्या आजारांना देखील समोर जावं लागेल . मग आता आपण पाहणार आहोत आपल्या पोटाचं घड्याळ कस सेट करायचा … विश्वास ठेवा हे घड्याळ जर तुम्ही सेट केला तर तुमच्या जिभेच्या चोचल्याना देखील पूर्ण करू शकता आणि ठणठणीत देखील राहू शकता .
सकाळचे जेवण असावे राजासारखे , दुपारचे जेवण असावे युवराजासारखे , आणि रात्रीचे जेवण असावे गरिबासारखे असे तंत्र जुनी पिढी सांगून गेली . पण आज मात्र हे पूर्णपणे उलटेच होते आहे . परिणामी या समस्या निर्माण होतात . सकाळी उठल्यानंतर लगेचच उपाशी पोटी चहा घेऊ नये . उठल्यानंतर प्रथम एक ग्लास पाणी प्यावे . पाणी नेहमी बसून शांतपणे प्यावे . चहा नेहमी बिस्कीट, खारी सोबत घ्यावा .व्यायाम आणि अंघोळी नंतरच सकाळचे जेवण हे ८ ते ११ च्या दरम्यान करावे . जेवण करून अंघोळ करू नये. असे केल्यास बीपीचा त्रास उद्भवू शकतो . जेवणाच्या अर्धा तास आधी भरपूर पाणी प्यावे. जेवताना आणि जेवण झाल्यानंतर तहान शमण्यापुरतेच पाणी प्यावे .
सकाळी जो नाश्ता केला जातो तो नेहमी राजा सारखा असावा , ज्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, कडधान्ये, दूध,तूप,सुका मेवा, फळे यांचा समावेश असावा . दुपारचे जेवण हे युवराजासारखे असावे . भाजी ,पोळी , मासे , वारण – भात यासह दुपारी ताक , दही , सोलकढी ,यांचा समावेश केल्यास उत्तम . दुपारचे जेवण हे १ ते ३ च्या दरम्यान करावे . सायंकाळचे जेवण मात्र गरीब सारखे असावे . भाजी आणि पोळी सायंकाळच्या जेवणात असावी . भाताचा मात्र रात्री जेवणात समावेश टाळावा . सायंकाळचे जेवण ७ ते ९ च्या दरम्यान करावे .
वेळेसह काही सवयी स्वतःला लावून घ्या , या सवयी अगदी साध्या आहेत त्यामुळे सहज तुम्ही त्या अंगिकारू शकता .
* जेवणानंतर शतपावली अवश्य करायला हवी . जेवणानंतर लगेच बसू किंवा झोपू नका . जर वेळ शरीराला हालचाल द्या .
* योग्य प्रमाणात पाणी प्या . वजनावरून तुम्ही अंदाज लावू शकता . जर तुमचे वजन ४० किलो आहे तर तुम्ही दिवसातून ४ लिटर पाणी प्यावे . जर वजन ५० किलो आहे तर ५ लिटर पाणी प्यावे .
* जेवण झाल्या नंतर बडीशेप , शोपा , खाल्यान्ने पचनास मदत होते . झोपताना छोटा गुळाचा खडा खा किंवा कोमट दुधात गुळाचा खडा घालून प्या .
* झोपताना डाव्या कुशीवर झोपावे . शरीराच्या नाही तर मेंदू किती थकला आहे त्या अंदाजाने कमीत कमी ८ तास झोप घेणे शरीरासाठी आवश्यक आहे .
* पोटावर झोपू नका . जमेल तितके टाळा .
* आठवड्यातून एकदाच चिकन, मटण यांचा समावेश असावा . पचायला जड , तेलकट आणि मसालेदार पदार्थ पचायला जड असल्याने रात्री आहारात घेणे
टाळावे
* सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जा .