मुंबई : हॅलो महाराष्ट्र – विप्रो ही आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी मानली जाते. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी क्षणार्धात हजारो रुपयांची देणगी देऊन प्रसिद्धीच्या झोतात आले. या कंपनीची मार्केटमधील गुंतवणूक दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तसेच त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील Nestle India, ONGC NTPC, Indian Oil या कंपन्यांची नावेदेखील तुम्ही ऐकलेच असतील. या सगळ्या कंपन्यांवर भारतातील एक मंदिर (tirupati temple) भारी पडले आहे. या मंदिराची मालमत्ता या कंपन्यांपेक्षा जास्त आहे.
हे मंदिर आहे तिरुपतीचे भगवान व्यंकटेश्वर म्हणजेच बालाजी मंदिर (tirupati temple) . तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिराची (tirupati temple) मालमत्ता 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त (सुमारे 30 अब्ज डॉलर्स) आहे. या मंदिराची मालमत्ता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी विप्रोच्या मार्केट कॅपिटलपेक्षा जास्त आहे. एवढेच नाहीतर तर या मंदिराची (tirupati temple) संपत्ती अन्न आणि पेय कंपनी Nestle India आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ONGC आणि Indian Oil यांच्या बाजार भांडवलापेक्षाही अधिक आहे.
मंदिराची पहिल्यांदाच मालमत्ता घोषित
भगवान वेंकटेश्वरला समर्पित तिरुपति मंदिरचे (tirupati temple) व्यवस्थापक तिरुमला तिरूपति देवस्थानची स्थापना 1933 मध्ये झाली. यानंतर मंदिराने प्रथमच आपली निव्वळ संपत्ती जाहीर केली आहे. मंदिराच्या मालमत्तेत बँकांमध्ये जमा केलेले 10.25 टन सोने, 2.5 टन वजनाचे दागिने, बँकांमध्ये जमा केलेली 16 हजार कोटी रुपयांची रोकड आणि देशभरातील 960 मालमत्ता यांचा समावेश आहे. ही एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी रुपये आहे.
दोन डझन कंपन्या मंदिरापेक्षा श्रीमंत
सध्या भारतातील सर्वाधिक श्रीमंत कंपन्यांमधील फक्त दोन डझन कंपन्या तिरुपती मंदिरापेक्षा (tirupati temple) श्रीमंत आहेत. यामध्ये मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा समूहाची टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँक, आयटी कंपनी इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, बहुराष्ट्रीय कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, भारती एअरटेल आणि आयटीसी यांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!