भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत, तुम्हीही थोडी वाट बघा ; तृणमूल खासदारांचे मोदींना खडेबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल निवडणूकी नंतर देखील ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यातील वाद शमन्या ची चिन्हे दिसत नाहीत. यास वादळाच्या नुकसानीच्या आढावा बैठकीवरून बंगालमध्ये नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली. मोदी यांच्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्धा तास उशिराने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधानांना वाट बघावी लागली. त्यानंतर भाजपाकडून ममतांवर टीका झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, संकटाच्या काळात जनतेला मदत देण्याच्या भावनेने आलेल्या पंतप्रधानांसोबत अशा प्रकारचा व्यवहार वेदनादायी आहे. जनतेच्या सेवेचा संकल्प आणि संविधानाने दिलेल्या कर्तव्यांच्या वर राजकीय मतभेदांना ठेवण्याचे हे एक दुर्दैवी उदाहरण आहे. हे भारतीय संघव्यवस्थेच्या भावनेला धक्का पोहोचवणारे आहे, असे ट्विट राजनाथ सिंह यांनी करत ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment