विविध मागण्यांसाठी : साताऱ्यात एसटी कर्मचाऱ्यांचे विभागीय कार्यालयात धरणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | एसटी कर्मचाऱ्यांना 16 टक्के महागाई भत्ता त्वरित लागू करावा, कोविड काळातील वैद्यकीय बिलांची रक्कम अद्यापही मिळाली नसून ती तत्काळ वर्ग करावी, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा विभागीय कार्यालयाबाहेर धरणे धरण्यात आली.

शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर 2019 पासून पाच टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात आला. परंतु, आता भत्त्यात वाढ करून 28 टक्के केला आहे. त्यामुळे 16 टक्के भत्ता तत्काळ लागू करावा, थकीत महागाई भत्ता देण्यात यावा. सणांची उचल 12 हजार 500 देण्यात यावी. एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे रखडले असून, ते तत्काळ देण्यात यावे, समायोजन श्रेणीतील आदेश तत्काळ दिले जावेत, वार्षिक वेतनश्रेणीची कमी केलेली टक्केवारी पूर्ववत करावी. दिवाळी बोनस 15 हजार रुपये मिळाला पाहिजे.

या मागण्या वारंवार मांडूनही पूर्ण केल्या जात नसल्याचे सर्व संघटना संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी संयुक्त कृती समितीचा विजय असो, हमारी एकता हमारी ताकद, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय असो, हमारी युनियन हमारी ताकद, थकीत महागाई भत्ता मिळालाच पाहिजे अशा देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. या वेळी संघटनेचे विभागीय संघटनेचे अध्यक्ष नाना घोणे, सचिव ज्ञानेश्वर घोणे, सुहास जंगम, धनाजी जाधव, आर. आर जाधव, पवन फाळके, शेखर कोठावळे, मोहन कणसे, हेमलता कदम, रहेना इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment