राजीव सातव यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेला सायटोमॅजिलो व्हायरस म्हणजे नेमका काय ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांचे कोरोना संसर्गाानंतर उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या शरीरात सायटोमॅजिलो व्हायरस (Cytomegalovirus) आढळून आला होता. यामुळे सामटोमॅजिलो व्हायरस नेमका काय आहे याविषयी माहिती आपण जाणून घेऊ.

काय आहे सायटोमॅगलो व्हायरस?

सायटोमॅगलो व्हायरस हा एक संसर्गजन्य आजार आहे. ‘बीबीसी मराठी’ नं दिलेल्या वृत्तानुसार गरोदर महिलांमध्ये या आजाराचा प्रमाण जास्त असतं. यामध्ये गर्भपात होण्याची शक्यता देखील जास्त असते. तसंच एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आढळतं. या व्हायरसच्या संसर्गामुळे दृष्टी जाऊ शकतात. रॅटिनावर याचा परिणाम होतो. काही लोकांमध्ये याचं इन्फेक्शन फुफ्फुसात होतं. याला सीएमई न्यूमोनिया म्हणतात

या व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याची याची लागण होते. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून पसरतो. स्तनपान करणाऱ्या आईपासून बाळाला देखील याची लागण होऊ शकते. नवजात बाळ तसंच लहान मुलांमध्ये हा आजार जास्त आढळत असला तरी ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा प्रौढ व्यक्तींना देखील याची लागण होऊ शकते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?

सायटोमॅजिलोची प्राथमिक लक्षणं म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना कमतरता जाणवते. ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्ग झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी रक्त चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो. सायटोमजिलो झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्त चाचणी आणि इतर मार्गांचा वापर केला जातो.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like