जावलीतील शेतकऱ्यांना आ. शिवेंद्रसिहराजेंकडून स्वःखर्चाने साहित्य वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मेढा | जावली तालुक्याला अतिवृष्टीच्या आस्मानी संकटाने तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्याने हवालादिल झालेल्या जावलीतील बळीराजाच्या शेतीची दैना झाली आहे. तर शेतातील विहीरीवरील मोटारीचे व तत्सम पाईपचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नादगणे, वाहीटे, भुतेघर तसेच पश्चिम जावलीच्या गावांना स्वःखर्चातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी साहित्य पुरविले आहे.

अद्याप प्रशासकीय मदत आलेली नाही. अतिवृष्टीने वेण्णा नदीला पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे  स्वखर्चातुन आ शिवेंद्रराजे भोसले यांनी नादगणे व वाहीटे गावातील शेतकऱ्यांना मोटर व संबधित सर्व साहीत्य दिले आहे.
दुर्गम जावलीतील कडेकपारीत सर्वसामान्य शेतकऱ्यांला आस्मानी संकटात मिळालेला मदत लाखमोलांची ठरत आहे. यावेळी ज्ञानदेव रांजणे, वाहिटे गावचे सरपंच राजाराम जांभळे, केळघरचे माजी सरपंच सुनिल जांभळे, अर्जुन जांभळे, दीपक जांभळे आदी उपस्थित होते.

जावलीतील अतिवृष्टीच्या संकटानंतर शेतीसह इलेक्ट्रॉनिक्स वस्तुचेही मोठे नुकसान झाले आहे. वाहीटे व नादगणे येथील नुकसान ग्रामस्थांनी आणि वाहिटे गावातील मुंबईस्थित लोकांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंशी संपर्क साधून पाणीप्रश्न सोडवण्याची मागणी केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तात्काळ स्वखर्चाने मोटार, पाईपलाईन, केबल, स्टार्टर आदी सर्व साहित्य उपलब्ध करून ग्रामस्थांकडे सुपूर्द केले आहे.