सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1 हजार 360 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1990 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात
जावली 75 (7447), कराड 231 (22053), खंडाळा 84 (10278), खटाव 262 (15584), कोरेगांव 250 (14163),माण 209 (11196), महाबळेश्वर 39 (4008), पाटण 158 (6750), फलटण 271 (25498), सातारा 336 (34952), वाई 62 (11489) व इतर 13 (1045) असे आज अखेर एकूण 164463 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसात
जावली 2 (166), कराड 4 (635), खंडाळा 3 (134), खटाव 4 (411), कोरेगांव 1 (312), माण 1 (208), महाबळेश्वर 1 (44), पाटण 0 (157), फलटण 4 (250), सातारा 3 (1022), वाई 3 (303) व इतर 0 असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.