हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १० जानेवारी रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसले होते. इतकेच नव्हे, जिथे आज चंद्रग्रहण होणार आहे, तिथे २१ जून रोजी दोन्ही सूर्यग्रहणही दिसणार आहे.
आजचे ग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. म्हणजेच, चंद्रावर फक्त एक अस्पष्ट छाया असेल.या चंद्रग्रहणामुळे चंद्राच्या आकारात कोणताही बदल होणार नाही आहे. यामध्ये चंद्र अगदी चिखलासारखा मातकट दिसेल.
ज्योतिषशास्त्रात या घटनेला ग्रहण म्हटले जात नाही, म्हणून त्याचा सूतक कालावधी वैध ठरणार नाही. चंद्रग्रहणात सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळे चंद्रांवर पडणारा सूर्यप्रकाश फारच कमी असतो. याला छाया चंद्रग्रहण असे म्हणतात.
हे चंद्रग्रहण आज रात्री ११:१६ वाजता सुरू होईल, जे ६ जून, शनिवारी दुपारी २.३४ वाजता समाप्त होईल. मागील १२:५४ वाजता या ग्रहणाचा प्रभाव जास्त असेल.
५ ते ६ जूनच्या रात्री चंद्रग्रहणाची वेळ
चंद्रग्रहण स्पर्श ५ जून रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी
चंद्रग्रहण मध्य ६ जून रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी
चंद्रग्रहण मोक्ष ६ जून रात्री ०२ वाजून ३४ मिनिटांनी
हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या देशांमध्येही पाहिले जाऊ शकते. मात्र यात चंद्राच्या आकारात कोणताही बदल दिसणार नाही, फक्त चंद्र किंचित मातकट दिसू शकेल.
यावर्षी चार चंद्रग्रहण होणार आहेत. यातील पहिले चंद्रग्रहण हे १० जानेवारीला दिसले होते. तर दुसरे चंद्रग्रहण हे या महिन्यात आहे. तसेच तिसरे जुलै आणि चौथे नोव्हेंबरमध्ये दिसेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.