आज संकष्टी चतुर्थीला करा गणेशाची मनोभावे पूजा; जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेलाच संकष्टी चतुर्थी आली आहे. संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. या दिवशी व्रत करण्यात येतो. तसेच, गणेशाची पूजा करण्यात येते. या चतुर्थीला गणेश चालिसा पठण करत गणेशाकडे सुख समृद्धी आणि भरभराटीची कामना केली जाते. आजची संकष्टी चतुर्थी ही विशेष मुहूर्तावर आली आहे. त्यामुळे आज गणेशाची मनोभावे पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील.

संकष्टी चतुर्थीची तिथी

हिंदू धर्मात श्री गणेशाला विशेष स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीला भाविक मनोभावे गणेशाची पूजा करतात. हिंदू पंचागानुसार, यंदा संकष्टी चतुर्थी तिथीनुसार, 31 ऑक्टोबरपासून रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी सुरु होईल. आणि ती 1 नोव्हेंबरला रात्री 9 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. परंतु संकष्टीचे व्रत आज म्हणजेच 1 नंबर रोजी करण्यात येईल.

चतुर्थीचा शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्यानंतर घरात सुख-समृद्धी नांदेल. गणेश पूजनासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 7.40 मिनिटांनी ते 9.31 मिनिटांपर्यंतच असणार आहे. तसेच सायंकाळी 7.10 मिनिटे ते 8.20 पर्यंत आपण गणेशाची पूजा करू शकतो.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे दिलेल्या शुभ वेळामध्येच गणेशाची पूजा करावी. पुजेवेळी गणेशाच्या नामाचे पठण करावे. तसेच, व्रत केले असल्यास त्याचे पालन योग्य पद्धतीने करावे. गणेशाची पूजा करण्यापूर्वी त्याला नैवद्य देखील दाखवावा.