दोन वर्षांनंतर भावी शिक्षकांसाठी आज टीईटी परीक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्य शिक्षण परिषदेतर्फे तीन वेळेस पुढे ढकलल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दोन वर्षानंतर आज सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होणार आहे. या दोन्ही पेपरसाठी जिल्ह्यातील एकूण 16 हजार 236 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्रावर 144 अन्वये मनाई आदेश शंभर मीटर परिसरात जारी केले आहेत.

परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य आणि शिक्षणाधिकारी निरंतर असे एकूण चार भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळेच्या किमान एक तास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र व ओळखपत्र आणणे आवश्यक असल्याचे परीक्षा आयोजन व सनियंत्रण समिती तथा सदस्य सचिव शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी कळविले आहे.

परीक्षासंदर्भात महत्त्वाच्या सूचना –
परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तापमान तपासणी मास्कचा वापर, अंतर बंधनकारक तसेच केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझरची व्यवस्था व मोबाईल, झेरॉक्स, फॅक्स, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपकांना मनाई आहे.

परीक्षेसाठी केंद्र व विद्यार्थी संख्या –
परीक्षा केंद्र – 54 भरारी पथक- 4
पेपर- 1 परीक्षार्थी – 13 हजार 199 (केंद्र 43)
पेपर- 2 परीक्षार्थी – 9 हजार 705 (केंद्र 31)

टीईटी वेळापत्रक –
सकाळी 10:30 ते 1 – शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1
दुपारी 2 ते 4:30 – शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2

Leave a Comment