Tokenization of cards : 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करा डेबिट-क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ महत्वाचे काम !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tokenization of cards : RBI कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या टोकनायझेशनची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. याआधी डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधिचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू केले जाणार होते. मात्र आता टोकनायझेशनची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 करण्यात आली आहे. यामुळे आता ज्यांनी अजूनही आपले कार्ड टोकनाइझ केलेले नाही त्यांना आणखी एक संधी मिळाली आहे.

हे लक्षात घ्या कि, सर्व क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा युनिक टोकनने रिप्लेस करणे महत्वाचे आहे. म्हणजेच, कार्ड पेमेंटच्या वेळी एक टोकन जनरेट केले जाईल जे ग्राहकाचे डिटेल्स उघड न करता पेमेंट करण्याची परवानगी देईल. Tokenization of cards

The coming disruption over card tokenization | Mint

टोकनायझेशन नियम लागू झाल्यानंतर काय होईल???

ऑनलाइन फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी RBI हे पाऊल उचलत आहे. टोकनायझेशननंतर, कार्डची माहिती केवळ जारी केलेल्या कंपनीच्या नेटवर्कवर स्टोअर केली जाऊ शकते. त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांकडे आधीच ग्राहकांच्या कार्डशी संबंधित डेटा आहे त्यांना ते डिलीट करावे लागेल. टोकनायझेशन सिस्टीम फ्री असेल आणि केवळ देशांतर्गत ट्रान्सझॅक्शनसाठीच लागू असेल. Tokenization of cards

New debit and credit card rules: Switch on, off your card, set your own  limit | Mint

आपण टोकनायझेशन केले नाही तर काय होईल???

जर ग्राहकांनी कार्ड टोकनायझेशनसाठी संमती दिली नसेल तर त्यांना प्रत्येक वेळी ऑनलाइन पेमेंट करताना कार्ड व्हेरीफिकेशन व्हॅल्यू म्हणजेच CVV एंटर करण्याऐवजी त्यांच्या कार्डचे डीटेल्स जसे की नाव, कार्ड क्रमांक आणि कार्डची व्हॅलिडिटी एंटर करावी लागेल. दुसरीकडे, जर ग्राहकाने कार्ड टोकन देण्यास सहमती दिली, तर त्याला/तिला ट्रान्सझॅक्शन करताना फक्त CVV आणि OTP डीटेल्स एंटर करावा लागेल. मात्र हे लक्षात घ्या की, टोकनायझेशन बंधनकारक नाही मात्र यामुळे तुमचा खरेदीचा अनुभव सुलभ होईल. Tokenization of cards

What is EMV tokenization? (2022)

टोकन कसे जनरेट करावे ???

कोणत्याही ग्राहकाला टोकन सिस्टीमसाठी कार्ड कंपनीकडे विनंती करावी लागेल. त्यानंतर युझर्सच्या कार्डचे सर्व डीटेल्स आणि युझर्सच्या मोबाइल किंवा टॅबलेटची ओळख यावरून टोकन तयार केले जाईल. हे टोकन जनरेट झाल्यानंतर ती कंपनी आपल्या ग्राहकांसोबत शेअर करेल. ज्याद्वारे ग्राहकाला ही वापरता येईल. Tokenization of cards

TOKENIZATION: HOW IT WORKS – ChamsAccess Ltd

तुमचे कार्ड टोकनाईझ कसे करायचे ???

आवडीच्या शॉपिंग वेबसाइट/अ‍ॅपला भेट देऊन वस्तू किंवा सर्व्हिस खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.
चेकआउट करताना आपल्या आवडीचा कार्ड पेमेंट पर्याय निवडा आणि CVV डीटेल्स एंटर करा.
त्यानंतर “Secure your card” किंवा “Save card as per RBI guidelines” वर क्लिक करा.
Save वर टॅप करा आणि OTP टाका.
यानंतर आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड टोकनाइज्ड केले जाईल. Tokenization of cards

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/commonman/English/Scripts/FAQs.aspx?Id=2917

हे पण वाचा :

इंग्लंडचा कसोटी संघाचे कर्णधार Ben Stokes म्हणाला,” मी IPL मध्ये तेव्हाच खेळेन जेव्हा…”

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

Train Cancelled : रेल्वेकडून आज 145 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे ट्रेनचे स्टेट्स तपासा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, आजच्या किंमती तपासा !!!

Motorola Edge 30 Ultra : 200MP कॅमेराचा पहिला मोबाईल भारतात लवकरच लॉंच होणार; काय असेल किंमत