हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानचे पंतप्रधान शिंजो अबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आबे म्हणाले की, ”बाख यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही दोघांनी यंदाची टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याबाबत १०० टक्के सहमती दर्शविली आहे. संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या कोरोनाव्हायरस या साथीच्या आजाराने ग्रासलं आहे अशा परिस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करणे सर्वात योग्य प्रतिक्रिया आहे.
खेळाडूंच्या आणि प्रेक्षकांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन ऑलिम्पिक स्पर्धेला स्थगिती हा एक उत्तम मार्ग आहे असे आबे यांनी म्हटलं. बाख यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आबे यांनी ऑलिम्पिक स्पर्धा २०२१ च्या उन्हाळ्यात आयोजित करण्यात येणार असल्याचं म्हटलं. टोकियो ऑलम्पिक स्पर्धा २०२० नंतर होत असली तरी २०२१च्या उन्हाळ्याच्या आधी तिचे वेळापत्रक निश्चित केले जाईल, असं आयओसी आणि टोकियो २०२० च्या आयोजन समितीने सांगितलं आहे.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.