नवी दिल्ली । टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्या खेळाडूंना कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी स्वत:च मेडल लावावे लागतील. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (IOC) अध्यक्ष थॉमस बाख यांनी 339 स्पर्धांच्या पारंपारिक पदक समारंभात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे. आता पदके गळ्यात घेतली जाणार नाहीत, असे बाख यांनी टोकियो येथील माध्यमांना सांगितले. तसेच टोकियोमध्ये समारंभात कोणीही हात मिळवणार नाही किंवा कोणालाही मिठी मारणार नाही.
“पदक एका ट्रे मध्ये खेळाडूंना दिले जातील आणि त्यानंतर एथलीट्सने पदक घेऊन त्यांना स्वतःलाच घालावे लागतील. बाख पुढे म्हणाले कि, “त्याच वेळी हे सुनिश्चित केले जाईल की, जो कोणी ट्रेमध्ये पदके ठेवेल त्याने ते निर्जंतुक केलेले हातमोजे घालून ट्रेमध्ये ठेवेल. जेणेकरून दुसरे कोणीही त्या पदकांना हात लावणार नाही याची काळजी घेतली जाईल.” एकीकडे ऑलिम्पिकमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे, तर युरोपमधील फुटबॉलमध्ये स्वत: यूईएफएचे अध्यक्ष अलेक्झांड्रे सेफेरिन यांनी अलिकडच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळाडूंच्या गळ्याभोवती पदके लावली आहेत.
रविवारी लंडनमध्ये झालेल्या युरो 2020 समारंभाच्या वेळी सेफेरिनने यांनी इटालियन गोलकीपर गियालुगी डोन्नरम्माशी हात मिळवला आणि पदकी तसेच ट्रॉफी देखील दिली. टोकियोमध्ये झालेल्या समारंभावेळी कोणीही हात मिळवणार नाही किंवा कोणालाही मिठी मारणार नाही याचीही बाख यांनी बुधवारी पुष्टी केली.
ऑलिम्पिक पदके सामान्यत: IOC सदस्याद्वारे किंवा क्रीडा मंडळाच्या वरिष्ठ अधिकारायन कडून दिली जातात. मात्र IOC ने यापूर्वीच असे म्हटले होते की,” पदकविजेते आणि समारंभाच्या अधिकाऱ्यांनाही मास्क घालावे लागतील.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा