टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेनमुलाणी, 

आनेवाडी टोल नाक्यावर टोल ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावरून मालट्रकची पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. हैबत दत्तोबा मोरे राहणार (मोरेवाडी) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे हैबत मोरे नाक्यावरील टोल ट्रॅकची सफाई करत होते. त्यावेळी ट्रॅक मधून मालट्रक निघाला होता. अचानक त्यांचा तोल गेल्याने ते ट्रेकमध्ये पडले. यावेळी मार ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला.

याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व मोरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.