Toll Plaza : जर तुम्ही सुट्टी दिवशी पुण्या मुंबईहून महाबळेश्वर कोल्हापूर, सातारा याठिकाणी जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इकडे जाताना तुम्हाला थोडेसे जास्त पैसे भरावे लागणार आहेत. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापुर टोल नाक्यावर एक एप्रिल पासून वाढीव दराने टोल वसुली करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा प्लान करत (Toll Plaza) असाल आणि तुम्हाला साताराच्या भागाला जायचं असेल तर तुम्हाला टोल साठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
टोल रोड (Toll Plaza) प्रशासनामार्फत याबाबत एक पत्र प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती विभागीय प्रमुख अमित भाटिया यांनी दिली आहे. येत्या एक एप्रिल पासून जवळपास अडीच टक्क्यांनी टोल वसुली करण्यात येणार आहे.
किती पैसे द्यावे लागतील? (Toll Plaza)
- पत्रकात जाहीर केल्यानुसार कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठी टोलच्या दरामध्ये पाच रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे आतापर्यंत 115 रुपये असणारा दर आता 120 रुपये द्यावा लागणार आहे.
- हलक्या आणि व्यावसायिक वाहनांच्या टोल (Toll Plaza) दरात पाच रुपयांची वाढ झाली असून यापूर्वी 185 रुपये द्यावे लागायचे मात्र आता 190 रुपये द्यावे लागणार आहेत.
- बस, ट्रक साठी टोलच्या रकमेत दहा रुपयांची वाढ होत असून या वाहनांना अधि चारशे रुपये द्यावे लागायचे ते आता 410 रुपये द्यावे लागतील.
- जड वाहनांसाठी 415 पासून पाच रुपये वाढवून 420 रुपये होणार आहे. तर अवजड वाहनांसाठी 615 रुपये टोल मध्ये पंधरा रुपयांची वाढ होणार असून अवजड वाहनांसाठी आता 430 रुपये टोल द्यावा लागणार आहे.
महाबळेश्वर चा प्रवास महागणार (Toll Plaza)
वीकेंडला पुणे मुंबई पासून जवळपास असणारे चांगलं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर. शनिवार रविवार महाबळेश्वरला जाणाऱ्यांची मोठी संख्या आहे. तुम्ही जर एक एप्रिल पासून महाबळेश्वरला जायचा प्लॅन करत असाल तर खेड शिवापूर टोल नाक्यावर चार चाकी खाजगी वाहनांसाठी पाच रुपयांनी जास्त पैसे मोजावे लागतील ही वाढ मोठी नसली तरी मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास विचारात घेतला तरीही संपूर्ण प्रवास आहे देणारे एकूण टोलनाके पाहता इंधनासह आता या टोल साठी येणारा सर्व समावेशक खर्चही वाढला आहे ही महत्त्वाक ची बाब आहे.