सुनील नारायणचा RCB ला चोप; वादळी खेळीपुढे बंगळुरू हतबल (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात (RCB Vs KKR) कोलकात्याचा सलामीवीर आणि अष्टपैलू खेळाडू सुनील नारायणने (Sunil Narine) तुफान खेळी करत RCB च्या गोलंदाजांना अक्षरशः चोप दिला. अवघ्या २२ चेंडूंत ४७ धावांची ताबडतोब खेळी करत नारायणने कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. नारायणच्या या खेळीने कोलकाता नाईट रायडर्सने बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव केला.

आरसीबीच्या १८२ धावांचा पाठलाग करताना सुनील नारायण आणि फिलिप सॉल्ट या दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या चेंडूपासून बंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. यामध्ये फिलिप सॉल्टने २० चेंडूत ३० धावा केल्या, तर सुनील नारायणने २२ चेंडूंत ४७ धावांची खेळी केली. नारायणने आपल्या या आक्रमक खेळीत २ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार मारले. दोन्ही सलामीवीरांनी पॉवरप्लेच्या पहिल्या ६ ओव्हर मध्ये ८० धावांची भागीदारी करत आरसीबीच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या दोघांव्यतिरिक्त, व्यंकटेश अय्यरने ५० तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३९ धावा केल्या.

https://www.iplt20.com/video/52377/narines-power-packed-4722

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १८२ धावा केल्या. विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या बेस्ट फॉर्म मध्ये दिसला. विराटने अखेरपर्यंत नाबाद राहत ५९ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कॅमेरून ग्रीन ३३ आणि ग्लेन मॅक्सवेलने २८ धावांची खेळी केली. तर अखेरच्या षटकात यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने फक्त ९ चेंडूत २० धावांची खेळी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. मात्र नारायणच्या वादळापुढे या धावा कमीच पडल्या.