हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Toll Tax : सध्या देशभरात रस्ते विकासाची कामे वेगाने सुरु आहेत. ज्याअंतर्गत अनेक नवनवीन महामार्ग बांधले जात आहेत. याद्वारे देशातील प्रमुख महानगरे एकमेकांशी जोडले जात आहेत. तसेच या मार्गांवर अनेक सुविधा देखील दिल्या जात आहेत. यामुळे आपल्या प्रवासाची वेळही कमी झाली आहे. तसेच या मार्गांवरून प्रवास करताना आपल्याला टोलही भरावा लागतो. मात्र हे जाणून घ्या कि, देशात अशीही काही लोकं आहेत ज्यांना टोल नाक्यावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
याबाबत परिवहन मंत्रालयाकडून एक लिस्टही जारी करण्यात आली आहे. त्यामधील माहिती नुसार सुमारे 25 जणांना टोल भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. वाहनांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्याच्या बांधकामासाठी Toll Tax चा वापर केला जातो. ज्यावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे नियंत्रण आहे. आता तर टोल जमा करण्यासाठी भारत सरकारकडून फास्टॅगही सुरू करण्यात आले आहे. ही एक कॅशलेस टोल देण्यासाठीची सिस्टीम आहे.
‘या’ वाहनांना द्यावा लागत नाही Toll Tax
हे जाणून घ्या कि, भारतात भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान, कोणत्याही राज्याचे राज्यपाल, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशातील लेफ्टनंट गव्हर्नर, पूर्ण जनरल किंवा समतुल्य दर्जाचे कर्मचारी प्रमुख, एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष, राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संसद सदस्य, लष्कराचे कमांडर लष्करप्रमुख आणि इतर सेवांमध्ये त्या अनुषंगाने राज्य सरकारचे मुख्य सचिव, भारत सरकारचे सचिव, सचिव, राज्य परिषद, लोकसभा, सचिव यांच्या वाहनांना Toll Tax न भरता प्रवास करण्याची परवानगी आहे.
‘या’ लोकांनाही मिळते सवलत
त्याच प्रमाणे निमलष्करी दले आणि पोलीस, कार्यकारी दंडाधिकारी, अग्निशामक विभाग, हेअर्स वाहनांसह गणवेशातील केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दलांना देखील कोणताही टोल टॅक्स द्यावा लागत नाही. याशिवाय, राज्याच्या दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर, एखाद्या राज्याच्या विधानसभेचे सदस्य आणि त्या-त्या राज्यातील विधानपरिषदेचे सदस्य, त्यांनी संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेले ओळखपत्र दाखवल्यास कोणताही Toll Tax भरावा लागणार नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://morth.nic.in/sites/default/files/faqs_exemptions.pdf
हे पण वाचा :
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
OnePlus चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन बाजारात घालणार धुमाकूळ, तपासा किंमत अन् फीचर्स
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
Gold Price Today : उच्च पातळीवरील नफावसुलीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत बदल, पहा आजचे दर
बेंगळुरूच्या SMVT स्टेशनवर ड्रममध्ये सापडला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; पोलिसांना सीरियल किलरचा संशय