औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असणाऱ्या जालना रोडवरील पुलांची देखभाल-दुरुस्ती करण्यावरून मनपा व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी सुरू झाली आहे. मुलांची देखभाल व दुरुस्ती कोणी करावी यातून दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्या मुलांची दुरुस्ती कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात आजघडीला पाच ते सहा उड्डाणपूल आहेत. यातील बांधकाम विभागाकडे शहरातील सेवन हिल पुलाचे हस्तांतरण करण्यात आले असून, पुल खराब झाल्याची ओरड सुरू झाल्यानंतरच ते जागे होतात. एमएसआरडीसी- मनपात फुलांच्या जबाबदारी वरून पत्र प्रपंचाच्या फैरी सुरू आहेत. बांधकाम विभागाकडे शहरातील फक्त एका मुलाची जबाबदारी आहे. 3 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुलांच्या जबाबदारी वरून मनपाने एका शब्दानेही उत्तर दिले नाही.
क्रांती चौक उड्डाणपुलावर धोकादायक गॅप पडल्याचे वृत्त समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर काल पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील सर्व मुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बांधकाम विभागाने ऑडिट सुरू केले आहे.