Tuesday, March 21, 2023

आधी विवाहित प्रेयसीला पळवले, नंतर मुलीचे अपहरण केले आणि मग….

- Advertisement -

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला तिच्या घरातून पळवून नेले. यानंतर काही दिवसांनी त्याचे तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मुलीला देखील पळवून नेले. या तरुणीच्या लग्नाच्या अगोदरपासून या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. हा तरुण लग्नानंतरही या विवाहित प्रेयसीच्या संपर्कात होता. यादरम्यान या दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय़ घेतला.

काय आहे नेमके प्रकरण ?
छत्तीसगडमधील एका विवाहित महिलेचे सूरज वर्मा या तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. यानंतर या दोघांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. या विवाहित प्रेयसीला एक मुलगी होती. त्या मुलीला ती आपल्या पतीकडेच सोडून आली होती. हे दोघे एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही काळाने या महिलेला तिच्या मुलीची आठवण येऊ लागली आणि तिने प्रियकराकडे मुलीला भेटण्याचा तगादा लावला.

- Advertisement -

प्रियकराने आखला अपहरणाचा डाव
आपल्या मुलीला काहीही करून आपल्याकडे घेऊन यावे असा हट्ट या महिलेने प्रियकर सुरज यांच्याकडे धरला होता. यानंतर सुरजने मुलीचं अपहरण करण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपल्या दोन मित्रांना सोबत घेतले. यामध्ये एक मित्र अल्पवयीन होता. यानंतर या तिघांनी मिळून मुलीच्या घराच्या परिसराची रेकी केली आणि मुलीच्या अपहरणाची योजना तयार केली. यानंतर त्यांनी संधी साधून मुलीला बाईकवर बसवून ते तिच्या आईकडे घेऊन आले.

पोलिसांनी अशा प्रकारे लावला शोध
आपली मुलगी संध्याकाळपर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी व कुटुंबीयांनी आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला आणि नंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर मुलीच्या वडिलांनी पळून गेलेली आपली पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यावर आपला प्राथमिक संशय असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास करत मुलीला शोधण्यात यश मिळवले. पोलिसांनी मुलीच्या आईला व तिच्या प्रियकराला अटक करून मुलीला वडिलांच्या ताब्यात दिले आहे.