हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2020 मध्ये चांगली सुरुवात केलेल्या दिल्ली (Delhi Capitals)ची कामगिरी अचानक घसरली. सलग 4 मॅच गमावल्यामुळे दिल्लीचा प्ले ऑफ चा रस्ता खडतर बनला आहे. आता दिल्लीला बँगलोरविरुद्ध करो या मरोचा सामना खेळावा लागणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना हा सामना जिंकवाच लागणार आहे. या मॅचमध्ये त्यांचा विजय झाला तर ते प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील, पण जर त्यांना हा सामना गमवावा लागला, तर मात्र त्यांना मुंबई आणि हैदराबादच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल.
दिल्लीच्या यंदाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं ते त्यांचा मॅच विनर ऋषभ पंतचा खराब फॉर्म.. ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलराऊंडर आणि दिग्गज प्रशिक्षक टॉम मूडी यांनी ऋषभ पंत याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. क्रिकइन्फोशी बोलत असताना टॉम मूडी म्हणाले की यंदाच्या वर्षी ऋषभ पंत आयपीएल खेळण्यासाठी लायकच नव्हता.
लॉकडाऊन दरम्यान फिटनेसवर लक्ष न दिल्याने रिषभ पंतचा खेळ खराब झाला. तसंच त्याला आयपीएलदरम्यानच दुखापतही झाली, ही दुखापतही खराब फिटनेसमुळे झाल्याचं मूडी म्हणाले. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच आव्हानांचा सामना करावा लागला, पण हे कारण असू शकत नाही, आपण 70 आणि 80 च्या दशकातलं क्रिकेट खेळत नाही,’ असा टोला मूडी यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’