भारतात वेगाने पसरतोय टोमॅटो फिव्हर; सर्वाधिक धोका कोणाला??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात गेल्या काही वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे . कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सने जनतेची चिंता वाढवली असून भरीस भर म्हणून आता एका नव्या आजाराने एंट्री केली आहे. हँड फूट माउथ डिसीज (HFMD), ज्याला टोमॅटो फिव्हर असेही म्हणतात. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने पसरत असल्याने आरोग्य तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

केरळमध्ये 6 मे 2022 रोजी टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळला होता आणि आतापर्यंत 82 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. हा ताप एक ते पाच वर्षे वयोगटातील लहान मुले
आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या प्रौढांना होतो. टोमॅटो फिव्हर म्हणजे काय हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे? त्याचा प्रसार कसा होतो? लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळता येईल? याबाबत आज आपण जाणून घेऊया …

टोमॅटो फिव्हरची लक्षणे काय आहेत?

टोमॅटो फ्लू असलेल्या मुलांमध्ये दिसणारी प्राथमिक लक्षणे चिकुनगुनिया किंवा डेंग्यू तापासारखीच असतात. लक्षणांमध्ये उच्च ताप, पुरळ, सूजलेले सांधे, मळमळ, अतिसार, निर्जलीकरण, तीव्र सांधेदुखी यांचा समावेश होतो. शरीर दुखणे, ताप आणि थकवा ही इतर लक्षणे कोविड-19 रूग्णांनी अनुभवली आहेत. काही प्रकरणांमध्ये, रुग्णांच्या त्वचेवर फोडांचा आकार लक्षणीय वाढला होता.

टोमॅटो फिव्हरची कारणे-

टोमॅटो फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत, परंतु सध्या हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात आहे. डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो, असेही काहींनी सुचवले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत हा व्हायरस आहे, परंतु तो कोणत्या विषाणूमुळे पसरत आहे किंवा कोणत्या विषाणूशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

काय घ्यावी काळजी-

टोमॅटो फ्लूपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर स्वच्छता पाळण्याचा सल्ला देतात. हा विषाणू पाच वर्षांखालील मुलांसाठी अधिक धोकायदाक असल्याचे मानले जाते. तुमच्या मुलामध्ये वरीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा. लहान मुले किंवा लोक ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांनी फोड फोडणे आणि खाजवणे टाळावे. जास्त पाणी प्या. जर एखाद्याला कोणतीही लक्षणे दिसली तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला टोमॅटो फिव्हर आहे.