टीम, HELLO महाराष्ट्र । लहान मुलांना पौष्टिक अन्न कसे खाऊ घालावे हा मोठा प्रश्न प्रत्येक आईला असतो . त्यात मुलांना चमचमीत आणि काहीतरी हटके हव असत. मग जुनीच डिश बनवताना त्यात काहीतरी वेगळ करता येऊ शकते . आता प्रश्न येतो ज्युस किंवा सूपचा … आज आपण पाहणार आहोत गाजर आणि टोमॅटोचे पौष्टिक सूप कसे बनवावे . हे सूप मुलांसाठी अत्यंत पौष्टिक आहे आणि झटपट बनणारे हे सूप मुलांना आवडेलही … चला तर मग पाहुयात हे सूप बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहेत .
साहित्य – १ टोमॅटो, २ गाजर, एकदम छोटा कांदा, १ छोटा बटाटा,मिरे साखर,
कृती – एक टोमॅटो, दोन गाजरे एक छोटा कांदा, एक छोटा बटाटा हे सगळे दीड कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमधून काढा. मीठ घाला. उकळून मुलांना भरवा. थोड्या मोठ्या मुलांना, थोडी साय किंवा क्रिम घाला. आणि त्यांना खायला द्या. हे सूप साधारणतः दीड आणि दीड वर्षांपुढील मुलांना दयावे.