‘या’ सेलिब्रेटींना 2021 मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं? गुगलकडून यादी जाहीर

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने यावर्षी सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रेटींची यादी जाहीर केली आहे. चला मग जाणून घेऊया गुगलकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्च लिस्ट मध्ये कोणाकोणाचा समावेश आहे.

1. नीरज चोप्रा
या लिस्टमध्ये नीरज चोप्राला सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे. नीरज चोप्रा हा भारतीय अ‍ॅथलेटिक्स आहे. त्याने नुकत्याच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.

2. आर्यन खान
या यादीमध्ये दुसरा क्रमांक बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा लागतो. आर्यन खान या वर्षीचा सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटी ठरला होता. जेव्हापासून तो ड्रग्ज प्रकरणात पकडला गेला तेव्हापासून त्याचे नाव गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. या प्रकरणात आर्यन खानला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते. आता तो तुरुंगातून बाहेर आला असला तरी त्याच्यावर खटला सुरूच आहे.

3. शहनाज गिल
या यादीमध्ये तिसरा क्रमांक लागतो तो टीव्ही अभिनेत्री शहनाज गिलचा. शहनाज गिल ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, पण या वर्षी दुसऱ्या कारणांमुळे चर्चेत राहिली. शहनाज गिल तिचा प्रियकर अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनानंतर चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूनंतर ती दोन महिन्यांनंतर सोशल मीडियावर आली आणि तिने सिद्धार्थ शुक्लाच्या श्रद्धांजलीचा व्हिडिओ शेअर केला. त्याच वर्षी शहनाजचा पहिला पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ देखील प्रदर्शित झाला होता जो खूप गाजला होता. या चित्रपटात शहनाज गिलसोबत दिलजीत दोसांझ प्रमुख भूमिकेत होता.

4. राज कुंद्रा
या यादीमध्ये चौथा क्रमांक लागतो तो बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीचा पती राज कुंद्रा याचा. राज कुंद्रा याला काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल आणि ते काही अ‍ॅप्सचा माध्यमातून प्रदर्शित केले. या प्रकरणात त्यांना अटकसुद्धा झाली होती. यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.

5. एलोन मस्क
या यादीमध्ये पाचवा क्रमांक लागतो तो स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक एलोन मस्क यांचा. एलोन मस्क हे टेस्ला कंपनीचे संस्थापकसुद्धा आहेत. त्यांनी टेस्ला कारची निर्मिती केली आहे. हि कार इलेक्ट्रिक आणि सोलरवर चालते.

6. विकी कौशल
या यादीमध्ये सहावा क्रमांक लागतो तो बॉलीवूड अभिनेता विकी कौशल याचा. अभिनेता विकी कौशल हा बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफसोबतच्या लग्नामुळे त्याला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा या ठिकाणी शाही थाटात पार पडला.

7. पी.व्ही.सिंधू
या यादीमध्ये सातवा क्रमांक लागतो तो बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हीचा. पीव्ही सिंधू ही एक भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू आहे. तिने या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. त्यामुळे या गुगलवर तिला सर्वाधिक सर्च करण्यात आले.

8. बजरंग पुनिया
या यादीमध्ये आठवा क्रमांक लागतो तो कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा. बजरंग पुनिया हा एक भारतीय फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे. त्यानेदेखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.

9. सुशील कुमार
या यादीमध्ये नववा क्रमांक लागतो तो माजी भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार याचा. यावर्षी माजी ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियन सागर धनकर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी सुशील कुमार याला अटक करण्यात आली आहे.

10. नताशा दलाल
या यादीमध्ये दहावा क्रमांक लागतो तो नताशा दलाल हीचा. नताशा दलाल हि एक फॅशन डिझायनर आहे. तिने फेब्रुवारीमध्ये बॉलीवूड अभिनेता वरून धवन याच्यासोबत लग्न केले होते. वरून धवन आणि नताशा एकमेकांना खूप वर्षांपासून डेट करत होते. अलिबागमधील एका रिसॉर्टमध्ये त्यांचे हे लग्न पार पडले.