Top 5 Places To Visit In Pune : पुण्यातील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे; वन- डे ट्रीपसाठी ठरेल बेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाणारे पुणे शहर समृद्ध इतिहास, सांस्कृतिक विविधता आणि आधुनिक विकासांमुळे  स्थानिक आणि पर्यटकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवत आहे. शैक्षणिक संस्था, गजबजलेले आयटी उद्योग आणि विश्वसुंदरता याचे आनंददायी मिश्रण म्हणून ओळखले जाणारे पुणे पर्यटकांना एक अनोखा अनुभव देते. मराठी साम्राज्याच्या कथा सांगणाऱ्या ऐतिहासिक खुणांपासून ते नैसर्गिक सौंदर्य आणि पाककृती यामुळे हे शहर प्रत्येक प्रवाशाला मोहून टाकते. आज आपण पुण्यातील ५ प्रसिद्ध स्थळे (Top 5 Places To Visit In Pune) पाहणार आहोत ज्याठिकाणी जाऊन तुम्ही पुण्याचे खरेखुरे रूप पाहू शकता.

Shaniwar Wada
Shaniwar Wada

१) शनिवार वाडा (Shaniwar Wada)

शनिवार वाडा हा पुण्याच्या मध्यभागी स्थित एक ऐतिहासिक वाडा आहे. हे पेशव्यांचे म्हणजेच मराठी साम्राज्याच्या पंतप्रधानांचे निवासस्थान होते. या वाड्याला एक आकर्षक इतिहासाची जोड आहे. प्रत्येक वेळी तो मराठी स्थापत्यकलेचे प्रदर्शन करवतो. वाड्याचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी लाईट आणि साऊंड शो विषत्वेकरून बनवला गेला आहे. दरवर्षी बाराही महिने महारष्ट्रातील विविध भागातून पर्यटक शनिवार वाड्याला (Top 5 Places To Visit In Pune) आवर्जून भेट देतात.

वेळ आणि प्रवेश शुल्क: दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ६:३० पर्यंत. तिकीटांची किंमत भारतीयांसाठी ५ रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी १२५ रुपये आहे. लाईट अँड साऊंडशोची किंमत २५ आहे.

Aga Khan Palace
Aga Khan Palace

२) आगाखान पॅलेस- (Top 5 Places To Visit In Pune)

आगाखान पॅलेसला देखील एक ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्यासाठी बनलेली तुरुंगव्यवस्था म्हणून आगाखान पॅलेस ओळखला जातो. सदर पॅलेसला आता गांधींचे स्मारक म्हणूनही ओळखतात, गांधींच्या निगडित छायाचित्रे आणि वैयक्तिक वस्तूंचे प्रदर्शन करणारे हे संग्रहालय देखील आहे. राजवाड्याच्या सभोवताली असलेली बाग शांतता प्रदान करते.

वेळ आणि प्रवेश शुल्क: राष्ट्रीय सुट्ट्या वगळता सकाळी ९ ते संध्याकाळी ७:३०. प्रवेश शुल्क भारतीयांसाठी १५ रुपये, लहान मुलांसाठी ५ रुपये, विदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये आहे.

Sinhagad Fort

३) सिंहगड किल्ला (Sinhagad Fort) –

पुण्यापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर, डोंगर माथ्यावर असलेला सिंहगड किल्ला आजूबाजूचा लेंडस्केपची चित्ताथरारक दृश्ये दाखवीतो. मराठ्यांच्या इतिहासात सिंहगड किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ट्रेकिंग आणि पिकनिकसाठी लोकप्रिय बनलेल्या ठिकाणांमध्ये (Top 5 Places To Visit In Pune)  याची गणना केली जाते. किल्ल्यावर निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेता येतो, आणि इतिहासातील अवशेष शोधताना मन थक्क होऊन जाते. सोबतच टेकडीच्या पायथ्याशी स्थानिक स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येतो.

प्रवेश शुल्क आणि वेळ: प्रति दुचाकी २० रुपये, चारचाकी साठी ५० रुपये आहे. सिंहगड किल्ला हा वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो, इच्छेप्रमाणे सकाळी ६ ते संध्याकाळी ६ दरम्यान याला भेट दिली जाऊ शकते.

Pataleshwar Cave Temple
Pataleshwar Cave Temple

४) पाताळेश्वर गुहा (Pataleshwar Cave Temple)

पाताळेश्वर गुहा या प्राचीन खडकात स्थित भगवान शिवाला समर्पित आहेत. यांना वास्तुशिल्पाचा चमत्कार म्हटले पाहिजे. सदर गुहा या आठव्या शतकातील असल्याचे मानले जाते, यात अनेक गुंतागुंतीचे कोरीव काम आणि शिल्पे पाहायला मिळतात. गजबजलेल्या शहरातून माघार घेत मंदिराच्या शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो.

पाताळेश्वर गुहांना सकाळी ८:३० ते संध्याकाळी ५:३० च्या दरम्यान भेट दिली जाऊ शकते तसेच येथे कुठलाही प्रवेश खर्च आकारला जात नाही.

rajiv gandhi zoological park
rajiv gandhi zoological park

५) राजीव गांधी प्राणी संग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park) –

कात्रज मधील राजीव गांधी प्राणी संग्रहालय (Top 5 Places To Visit In Pune) जवळपास १३० किलोमीटरवर पसरलेले आहे. या उद्यानामध्ये विविध जातींचे सर्प आणि जंगलातील प्राणी पाहायला मिळतात. हे प्राणी संग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस जाईल एवढे विस्तृत पसरलेले आहे. दिवसभराच्या कामातून निवांतपणा हवा असेल तर या उद्यानात नक्कीच जायला हवे.

राजीव गांधी प्राणी संग्रहालयमध्ये लहान मुलं आणि विद्यार्थी वर्गासाठी १० रुपये,भारतीय पर्यटकांसाठी ४० रुपये तर विदेशी पर्यटकांसाठी १०० रुपये.फोटोग्राफी कॅमेऱ्यासाठी ५० रुपये, व व्हिडिओग्राफी करायचे असल्यास २०० रुपये स्वीकारले जातात. विकलांग आणि आंधळ्या लोकांसाठी येथे कुठलाही शुल्क आकारला जात नाही. सरपोद्यानाचा प्रवेश सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५ असा आहे. ( सदर उद्यान हे बुधवारी खुले असत नाही)

याशिवाय पुण्यात पर्वती, पुणे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन, नॅशनल वॉर मेमोरियल, दगडूशेठ गणपती, कसबा गणपती अशा काही उल्लेखनीय ठिकाणांना भेट देता येते.