हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण बरेचदा जंक फूडचे सेवन करतो. त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम योग्य प्रमाणात मिळत नाही. आणि याउलट आजारी पडण्याचे चान्सेसही वाढतात. म्हणूनच प्रोटीन्स युक्त पदार्थ खाणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीरात नवीन पेशी तयार होण्यासाठी मदत होईल. नॉन व्हेजिटेरियन लोक हे प्रोटीन मास, मच्छी, अंडे यातून मिळवून घेतात पण व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन साठी काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो. चला आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रोटीनयुक्त पदार्थांबाबत सांगणार आहोत जे व्हेज लोकांसाठी उपयुक्त आहे.
1) शेंगदाणा (Peanuts) –
घरगुरी वापरातील शेंगदाणा हा सुद्धा प्रोटीनचा मुख्य सोर्स आहे. शेंगदाण्यात प्रोटीन, फॅट्स आणि अनेक पोषकतत्वे असतात. शेंगदाण्यामुळे ब्लड शुगरही आटोक्यात राहते. 100 ग्रॅम शेंगदाण्यामधून 567 कॅलरी मिळतात आणि 25.8 ग्रॅम प्रोटीन मिळते.
2) चणे (Chickpeas) –
रोजच्या खाण्यातील चणे तर आपल्याला माहीतच असतील. तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु यामध्ये यामध्ये 7.25 ग्राम प्रोटीन असते. चणे पोषणाची कमी पूर्ण करण्यासाठी गरजेचे आहे. प्रोटीन सोबतच शरीराला, फायबर, विटामिन, कॅल्शियम या सर्व गोष्टी मिळण्यासाठी चणे खाणे गरजेचे आहे.
3) डाळ (Dal)-
व्हेजिटेरियन अन्न पदार्थांमध्ये डाळींचा समावेश केल्यामुळे शरीराला प्रोटीन मिळते. एवढेच नाही तर फायबर,विटामिन, कॅल्शियम हे सर्व घटक डाळी मध्ये आढळतात. डाळींच्या प्रकारात मूगदाळ, तूर डाळ, हरबरा डाळ, मसूर डाळ या डाळींचा वापर होतो.
4) टोफू (Tofu) –
हा पदार्थ पनीर सारखाच असतो. यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते. 100 टोपण मध्ये कमीत कमी 10 ते 12 ग्राम प्रोटीन असतं.
5) मटार (Peas) –
पावसाळ्याच्या मध्ये आपल्याला सर्वत्र मटार म्हणजेच वाटाणा दिसतो. या मटार मध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट, फायबर, असे अनेक पोषक तत्वे असतात. साधारण 100 ग्रॅम मटार मध्ये ४ ते ५ ग्रॅम प्रोटीन असते. चवीसोबतच तब्येतीसाठी सुद्धा फायदेशीर असलेलं मटार नक्की खा.