हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचं टाळतात. मात्र, सध्या आथिंडी कमी झाली असल्याने अनेकजण फिरण्याचे नियोजन करत आहेत. तुम्हीही विकएंडला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हटके अशी TOP 5 ठिकाणे कि जेथे तुम्ही भरपूर आनंद घेऊ शकता.
आपल्या देशात पर्यटन स्थळांची काही कमी नाही. अशी काही हटके थकणे आहेत कि त्याठिकाणी तुम्ही उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये जाऊ शकता. तर चला तर मग पाहूया ती ठिकाणे आणि जाणून घेऊया काय आहेत त्याची खासियत…
1) खजुराहो (Khajuraho)
मध्य प्रदेशमधील खजुराहो हे पुरातत्वचा एक खजिना आहे. हे असे ठिकाण आहे ज्याठिकाणी प्रत्येकजण जात असतो. ही जागा अनेकांना आकर्षित करत असते. मध्ययुगीन काळातील वास्तूकला याठिकाणी पाहायला मिळते. याठिकाणी शंभर हिंदू आणि जैन मंदिरांचा एक समूह असल्याचेही सांगितले जाते. तसेच भारतातील प्रमुख वारसा स्थळांमध्ये देखील या ठिकाणाचा समावेश आहे. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर पन्ना नॅशनल पार्क, लक्ष्मण मंदिर आदी ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता.
2) शिलांग (Shillong)
उत्तर भारतात एकापेक्षा एक अनेक स्थळ आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही फिरू शकता. मात्र, यापैकी सर्वात सुंदर स्थळ म्हणजे शिलांग. मार्च महिन्यामध्ये देखील याठिकाणी मान्सून असतो. त्यामुळे पर्यटकांना या स्थळाची जास्तच ओढ असते. तसेच भारतीयांसोबत विदेशी पर्यटक देखील याठिकाणी फिरायला येत असतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जात असाल तर नक्की शिलांगला जा. त्याठिकाणची थंडी, मनमोहक दृश्य या सर्व गोष्टींमुळे तुमची ट्रीप अविस्मरणीय होईल.
3) कोडाईकनाल (Kodaikanal)
तुम्ही तामिळनाडूला फिरायला जायचा विचार करत असाल कोडाइकनाल हा चांगला पर्याय आहे. तलाव, झील आणि पहाडी या ठिकाणाचे आकर्षण आहे. इथं तुम्ही फिरायला गेल्यास ट्रेकींग देखील करू शकता. सिल्वर कैसकेड फॉल्स और ब्रायंट पार्क अशा ठिकाणी देखील तुम्ही फिरायला जाऊ शकता. तसेच येथील स्थानिक जेवण देखील अतिशय रुचकर असतं. त्यामुळे तुम्ही त्याचा देखील आनंद घेऊ शकता.
4) त्रिवेन्दम (Trivandrum)
त्रिवेन्द्रम किंवा तिरुवनंतपुरम ही केरळ ची राजधानी असून पर्यटना साठी अत्यंत सुंदर शहर आहे. प्रसिध्द असे पद्मनाभस्वामी मंदिर या शहरात असून आपल्या अमर्याद संपत्ती मुळे देशभरात प्रसिद्ध आहे.भगवान विष्णूचे देशातील पुरातन मंदिर असल्यामुळे अनेक भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. पद्मनाभ स्वामी मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला दुपारी १२ च्या आत जावे लागेल,कारण दुपारी १२ नंतर मंदिर दर्शनासाठी बंद होते.त्रिवेन्द्रम मध्ये नेपियर संग्रहालय,समुद्र किनारा व शहरातील ब्रिटीश वास्तुकलेच्या इमारती पाहण्यासारख्या आहेत.
5) लोणार सरोवर (Lonar Sarovar)
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या लोणार सरोवराची निर्मीती नैसर्गिक घटनेमूळे म्हणजेच उल्कापातामूळे झालेली आहे. खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून लोणार सरोवर प्रसिद्ध आहे. येथे बेसाॅल्ट खडक आढळतो. या सरोवराचे पाणी अल्कधर्मी असल्याचं पहायला मिळतं. लोणार सरोवराच्या आजूबाजूला असलेली मंदिरे खुप जूनी आहेत. जवळपास बाराशे वर्षांपूर्वीची ही मंदिरे आहेत. आत मध्ये असलेल्या मंदिरा जवळ उभे राहून देखील आपल्याला सरोवराचे नैसर्गिक स्वरूप पाहता येते. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये लोणार सरोवर हे एक आहे. लोणार सरोवर हे एक निसर्ग निर्मित पर्यटन स्थळ असल्यामूळे येथे निसर्ग प्रेमी व देश-विदेशातील पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देश व विदेशातील अनेक संस्थांनी लोणार सरोवराचे संशोधन केले आहे.