हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणे प्रसिद्ध आहेत. मात्र, या ठिकाणापाईकी काही अशी सुंदर ठिकाणे आहेत कि तेथे गेल्यावर तुम्हालाच स्वर्गातील दृश्याची अनुभूती येईल. फेब्रुवारी महिन्याचे आठवड्याचे शेवटचे दिवस येत आहे आपनही फिरायचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही अशी TOP 6 सुंदर ठिकाणे घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुया ती सुंदर ठिकाणे…
1) माळशेज घाट (Malshej Ghat)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि सुंदर असलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणजे माळशेज घाट होय. हा घाट मुंबई-पुण्यापासून जवळच आहे. कल्याणहून 86 कि.मी.चा टप्पा दीड-दोन तासात संपतो. कल्याणहून बससेवा उपलब्ध आहे. या स्थळाची लोकप्रियता पाहता परदेशी पर्यटक मुंबईत उतरल्यावर व्यस्त जीवनशैली टाकून सरळ विश्रंतीसाठी माळशेज घाटाकडे वळतात. त्यामुळे मुंबई विमानतळापासून तिथे जाण्यासाठी टॅक्सी सहज मिळते.
एकदा काय माळशेज परिसरात आले की उंचच उंच गिरीशिखरं दिसतात. सर्वात प्रथम मनात भरतो तो इथला हरिश्चंद्र गड. पावसाळ्यात येथे डोंगरातून झरे लागलेले दिसतात. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून दुडूदुडू वाहणारे खटय़ाळ झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे.चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.
2) कामशेत (Kamshet Hill Station)
महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेले कामशेत हे ठिकाण आज भारतातील paragliding राजधानीत म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, आणि निळेशार सरोवर या हिलस्टेशनचं वैशिष्ट्य. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींग व ट्रेकींगचा थरार अनुभवू शकता. मान्सून मध्ये येथील पॅराग्लायडिंग जरी बंद असली तरीही निसर्गाचा आस्वाद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.
कामशेत मुंबई पुणे हायवे लगत असल्याने या परीसरात अनेक धाबे आहेत जेथे आपल्याला शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळतात.राहण्यासाठी कामशेत व नजीकच्या परीसरात कॅम्प साईट्स, रेसॉर्ट्स, वीला, अशे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जवळील MTDC रेसॉर्ट्स २.३ किलोमीटर अंतरावर कार्ला येथे आहे.
3) दापोली (Dapoli)
दापोली केंद्रस्थानी ठेवून सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य आहे. ‘वीकएंड’ला या सर्व स्थळांना भेट देऊन परत मुक्कामी परतता येते. अलीकडे प्रत्येक वीकएंडला दापोलीत येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दापोलीचा पर्यटनाचा हंगाम हा बाराही महिने असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील अनेक ठिकाणे आता पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित होत आहेत. थंड, प्रसन्न हवेमुळे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून असलेली ओळख यामुळे पर्यटकांना दापोली अधिकच भुरळ पाडत आहे.
4) अलिबाग (Alibaug)
महाराष्ट्रातील अलिबाग शहर समुद्रकिनार्याला लागून आहे. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे.
अलिबागच्या समुद्रकिनार्यांशिवाय किहीम, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत. कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत.
5) दिवेआगार (Dive Agar)
दिवेआगर हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. एकदा दिवेआगर ला भेट देवूनही मन भरला नाही म्हणून परत सगळं अनुभवण्यासाठी,समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी,लहान पण सुबक मंदिरांच दर्शन’ घेण्यासाठी व कोकण मेवा खाण्यासाठी एका वीकेंडला पुन्हा एकदा पाय दिवेआगर कडे वळले.. दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्याजवळ पोचतो.
6) निघोज रांजणखळगे (Nighoj Ranjankhalge)
अहमदनगरला निसर्गाने खूप भर भरून दिलंय ह्याचाच एक उदाहरण निगोज चे रांजणखळगे होय. अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते. आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही.
अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. पावसाळयात खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.