पावसाळ्यात पुण्यातील ‘या’ TOP 5 पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा म्हंटल की, निसर्गाच्या सानिध्यांत जावं आणि मनसोक्तपणे पावसात चिंब व्हावं अशी भावना सर्वांचीच असते. आता नुकताच उन्हाळा संपत आला असून मान्सूनचे आगमनाची वाट सर्वजण पाहत आहेत. उन्हाळ्यात एकीकडे अंगाची लाही लाही झाली असताना पावसाळ्यात पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जाऊन निसर्गाचा आस्वाद घेऊ असं वाटण सहाजिकच आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या आसपास असलेल्या काही टॉप पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही त्याठिकाणी जाऊन मस्त आनंद घेऊ शकता.

Pavana Lake

१) पवना लेक- Pavana Lake

पवना लेक हे पुण्यापासून फक्त 65 किमी अंतरावर आणि लोणावळा रेल्वे स्थानकापासून जवळपास २० किलोमीटर अंतरावर आहे. या सरोवराचा आकार आणि तेथील एकूण दृश्य नक्कीच तुमचं मन लोभीत करेल. खासकरून पावसाळ्याच्या दिवसात येथे येणे तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. पवना लेकमध्ये कॅम्पिंग, फिशिंग आणि वॉटरस्पोर्टसह इतर साहसी उपक्रमाचा आनंद घेता येतो. तुम्ही तुमच्या परिवारासोबत किंवा मित्र- मैत्रिणींसोबत याठिकाणी येऊन मनसोक्त एन्जॉय करू शकता. त्यामुळे पर्यटकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे.

Bhimashankar

२) भीमाशंकर- Bhimashankar

भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर अतिशय शांत आणि सुंदर ठिकाण असून शंभू महादेवावर भक्ती असलेले भाविक भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यामध्ये येथील निसर्गाची शोभा आणखी वाढते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही भीमाशंकर परिसरात भेट देऊ शकता.

Empress Garden

३) एम्प्रेस गार्डन- Empress Garden

एम्प्रेस गार्डन हे पुण्यातील सगळ्यात लोकप्रिय असे पिकनिक स्पॉट आहे. हे गार्डन 39 एकर परिसरात पसरलेलं असून पूर्ण दिवस घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे आपल्याला अनेक प्रकारची फुले पाहायला मिळतात. ही बाग हे नैसर्गिक आणि कृत्रिम निर्मितीचे परिपूर्ण मिश्रण आहे. गार्डनच्या मधोमध एक ओढा वाहत आहे जो त्याच्या सौंदर्यात भर घालतो. खास करून लव्ह कपल याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

Mulshi Dam

४) मुळशी धरण- Mulshi Dam

मुळशी धरण हे पुणे जिल्ह्यातील मुळा नदीवरील धरण आहे. पुणे आणि मुळशी येथे धरण अंतर 50.6 किमी आहे. आपण एक निसर्ग प्रेमी असाल तर, नक्कीच आयुष्यात एकदा तरी मुळशी धरणाला भेट द्या. चारी बाजूंनी हिरवळ, थंडगार वातावरण, असे हे नयनरम्य ठिकाण आहे. खासकरून पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

Parvati Hills

५) पार्वती हिल्स- Parvati Hills

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पुण्यात गेल्यानंतर आपण पार्वती हिल्सला नक्की भेट द्या. येथील सुंदर दृश्य हे आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतील. पार्वती येथील मंदिर हे पुरातन असून याच्या चारही बाजू निसर्ग सौंदर्यांने नटलेल्या आहेत. या टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत. पावसाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.