आपल्या भारताला एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात असणाऱ्या वास्तू त्याचप्रमाणे इतर अनेक असे ठिकाण आहेत. जे पाहिल्यावर आपल्याला ऐतिहासिक गोष्टी समजतात. काही वास्तू या खूपच छान आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. असाच जयपुरमध्ये एक अद्भुतपूर्व वाडा आहे. ज्याला भिंती नाही. हा वाडा फक्त दरवाजातच बांधला आहे. म्हणजेच या वाड्याला फक्त दरवाजा आहेत. हे ऐकून तुम्हाला कदाचित विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे.
त्याचप्रमाणे हा वाडा अजूनही अस्तित्वात आहे. हा महल जयपुरमध्ये आहे. जयपुरमधील जवाहर सर्कस जवळ बांधलेला हा वाडा आहे. त्याला तोरण असे म्हणतात. पर्यटकांचे हे अगदी आकर्षण स्थळ आहे. जयपुरमध्ये प्रवेश करताच पर्यटकांना हा तोरण दिसतो. पर्यटकांच्या स्वागतासाठी तो बांधण्यात आलेला आहे. जयपुर विमानतळावरून शहरात प्रवेश करतात या वाड्याची कमान दिसते.
हा तोरण पाहिल्यावर अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, ही वास्तू अशी का बांधली आहे. याची रचना ही एका पांढऱ्या महालासारखी दिसते. ही रचना राजस्थानी परंपरा दर्शवते. राजस्थानमध्ये जेव्हा वर आणि वधू लग्न करतात. तेव्हा त्यांच्या लग्नाची मिरवणूक घेऊन मुलीच्या घरी जातात. तेथे प्रथम तोरणला स्पर्श केला जातो. आणि नंतर पाहुणे घरात जाऊ शकतात. येथे सर्व पर्यटकांचे वरासारखे स्वागत केले जाते.
या तोरण महालाची सर्वत्र खूप चर्चा आहे. परंतु काही लोकांनी या ठिकाणी रिल्स देखील बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी चढून फोटो देखील काढलेले आहेत. परंतु येथे फोटो काढण्याास किंवा रिल्स काढण्यास पूर्णपणे मनाई आहे.