जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तापी नदीवरील हतनूर धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. जळगावमध्ये गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी ९ वाजता धरणाचे १२ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले.

सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खबरदारी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, हतनूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पाऊस परतल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या देखील आता सुरु होणार आहेत. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहिला तर जिल्ह्यात खरीप हंगामाचा पेरा 100 टक्के पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

दरम्यान, राज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment