भाजपचा कसबा ; शिवसेनेचा सवता सुभा ; काँग्रेसची गटबाजी ; बहुरंगी लढत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्य वस्तीत असणारा कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपने लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत सोपी नाही. कारण त्यांच्या विरोधात उभा राहिलेले सर्वच उमेदवार तगडे आहेत. तर शिवसेने या मतदारसंघात बंडखोरी देखील केली आहे.

पुण्याच्या महापौर असणाऱ्या मुक्ता टिळक यांच्या घराण्याचा वारसा आणि त्यांची महापौर पदावरची कामगिरी बघून त्यांना उमेदवारी दिली. त्यात त्या महिला असल्याने देखील त्यांना प्राधान्य दिले. प्राधान्य यासाठी की , भाजप उद्या छाती ठोकपणे सांगणार आमच्याच पक्षाकडे सर्वाधिक महिला आमदार आहेत. म्हणून हा सर्व खटाटोप आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र मुक्ता टिळक यांची विधानसभेची वाट थोडी बिकट आहे. कारण शिवसेनेने त्यांच्या विरोधात बंड केले असून विशाल धनवडे हे शिवसेनेचे नगरसेवक मुक्ता टिळक यांना अपक्ष आव्हान देणार आहेत. त्याच प्रमाणे मनसेने देखील या मतदारसंघात आपल्या शहर अध्यक्षांना मैदानात उतरवले आहे.

काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे चित्र या मतदारसंघात बघायला मिळाले आहे. कारण काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या मतदारसंघावर काँग्रेसच्या उमेदवारीचा दावा सांगितला. त्यांच्या दाव्याने रवींद्र धंगेकर गर्भगळीत झंझाले. मात्र त्यांनी अपक्ष उभा राहून मुक्ता टिळक यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस,मनसे , शिवसेना बंडखोर आणि रवींद्र धंगेकर यांच्या विरोधाला मुक्ता टिळक यांना तोंड द्यायचे आहे. त्यामुळे सुरुवातीला सोपी वाटणारी लढत आता चांगलीच कठीण झाल्याचे चित्र बघायला मिळणार आहे.