सातारा प्रतिनिधी । उसाने भरलेल्या टॅक्टरला सुमो गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुमो गाडी मधील ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की वहागाव तालुका, कराड येथील अशोक हाॅटेल समोरील रस्त्यावरून चाललेल्या उसाच्या टॅक्टरला (नंबर MH,11U 3389) पाठीमागून येणाऱ्या सुमो गाडीने (नंबर MH, 08 , R 1042) जोरदार धडक दिली. उसाच्या टॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या अपघातात सुमोमधील प्रसाद जगन्नाथ नाईक , मारुती सदाशिव डांगे , सविता कुंभार , मारुती अप्पासाहेब गाडीवडर, विद्या सागर कांबळे , सर्वजण राहणार कोल्हापूर हे चांगलेच जखमी झाले आहेत.
या अपघातातील जखमींना तातडीने हायवे वरील ऍम्ब्युलन्सने कराड येथील कृष्णा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण सुमो कारने कोल्हापूरहून साताऱ्याला कामानिमित्त निघाले होते. मात्र ओव्हरटेक करताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. यावेळी तळबिड पोलिस स्टेशनचे कर्मचारी शहाजी पाटील , अमर नारनवर तसेच हायवे हेल्पलाइन कर्मचारी रमेश खुणे यांनी जखमींना तातडीने जखमींना हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली. सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.