हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. चांदणी चौक आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबतच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी साताऱ्याहून मुंबईला जाताना चांदणी चौकात थांबून वाहतूक कोंडीची परिस्थिती जाणून घेतली आणि प्रशासनाला काही सूचनाही दिल्या. त्यानुसार नवीन ब्रिज होईपर्यंत 100 वाहतूक कर्मचारी तैनात राहतील असं शिंदेनी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, या ब्रिज काम होईपर्यंत उद्यापासूनच 100 वाहतूक कर्मचारी वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी असतील. अवजड वाहतूक पण व्यवस्थित केली जाईल. पुढच्या 15 दिवसात सगळं व्यवस्थित सुरू करू. युद्धपातळीवर काम करून प्रश्न सोडवू. हद्द वाद आता या चांदणी चौकात येणार नाही, सगळे शहर एकमेकांना जोडली आहेत, आधी कामं करा आणि मग हद्द बघा अशा सूचना पोलिस आणि प्रशासनाला दिल्या आहेत”,अशी प्रतिक्रिया शिंदेनी दिली.
https://www.facebook.com/watch/?v=626481622378248&extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&ref=sharing
दरम्यान, मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतुकीच्या कोंडीचा सर्वात मोठा सामना पुण्यातील चांदणी चौकात करावा लागतो. त्या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा असतात. यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच एकनाथ शिंदे साताऱ्याला जात असताना नागरिकांनी या वाहतूक कोंडीची समस्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्या होत्या. त्यानंतर या समस्येचा आढावा घेण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आणि आता परत मुंबईला जातांना या सर्व परिसराची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.