हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गावरील वाहतूक पहाटे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहाटे चार ते सकाळी आठ वाजेपर्यंत ही जड वाहनांना महामार्गांवर प्रवेश बंद असेल. कार्तिकी एकादशीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महामार्गावर झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि पोलीस अधीक्षक (महामार्ग) संजय जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. जुना पुणे-मुंबई महामार्ग, नाशिक महामार्ग आणि सातारा महामार्गावर सकाळच्या सुमारास अवजड वाहतूक करण्यास बंदी राहील.
मावळातील साते गावाजवळ शनिवारी वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो शिरुन झालेल्या दुर्घटनेत 4 महिलांचा मृत्यू झाला. तर 24 वारकरी जखमी झाला. या दुर्घटनेंतर समाधी सोहळा होईपर्यंत मुंबई-पुणे महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने वारकरी मंगळवारी येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.