कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
येथील कृष्णा घाटावर शासकीय कामात अडथळा आणून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 9 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष बाळकृष्ण पाटणकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. महेश नागाप्पा थोरात व 21 राहणार शाहू चौक कराड असे पोलिसाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या चे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील कृष्णा घाटावर मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची गाडी चालविणाऱ्या स्टॉल वाल्या महेश मारहाण करत होता. त्याचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष पाटणकर यांनी हस्तक्षेप केला.
याचा राग मनात धरून महेश थोरात याने पाटणकर यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांच्या बरोबर कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली. याबाबत पाटणकर यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी महेश थोरात याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.