हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Train Ticket Refund : आपल्या देशातील लाखो लोकं दररोज रेल्वेने प्रवास करतात. ज्यामुळे भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे देखील म्हटले जाते. रेल्वे प्रसाशनाकडूनही नागरिकांसाठी अनेक सुविधा पुरविल्या जातात. मात्र, असे असूनही बहुतेक प्रवाशांना रेल्वेशी संबंधित अनेक नियमांची माहिती नसते. ट्रेन रद्द झाली तर प्रवाश्यांना रिफंड मिळतो याची माहिती जवळपास सर्वच लोकांना आहे. मात्र जर आपली ट्रेन चुकली तर आपल्याला रिफंडसाठी क्लेम करता येईल का ??? तर याचे उत्तर होय असे आहे. जर आपली ट्रेन सुटली तरी प्रवाश्यांना तिकिटाचे पैसे परत मिळू शकतील.
हे लक्षात घ्या कि, आपण ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत जर ती ट्रेन आपल्याला पकडता आली नाही अथवा आपल्याला प्रवास करता आला नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तिकिटाचे पैसे परत मिळू शकतील. मात्र त्यासाठी आपल्याला क्लेम करावा लागेल. मात्र त्यासाठी काही अटींची पूर्तता पूर्ण करावी लागेल. Train Ticket Refund
TDR भरावा लागेल
इथे हे लक्षात घ्या कि, जर आपली ट्रेन चुकली असेल तर TDR म्हणजेच Ticket Deposit Receipt फाइल करावी लागेल. मात्र, हे काम चार्टिंग स्टेशनवरून ट्रेन सुटल्यानंतरच्या एका तासाच्या आत करावे लागेल. आपल्याला TDR ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने देखील दाखल करता येईल. रेल्वेकडून रिफंडसाठी TDR जारी केला जातो. तसेच या प्रक्रियेस अंदाजे 60 दिवस लागू शकतात. Train Ticket Refund
अशाप्रकारे ऑनलाइन दाखल करा TDR
यासाठी आपल्या IRCTC खात्यामध्ये लॉग इन करा.
यानंतर बुक केलेल्या तिकीट हिस्ट्रीवर क्लिक करा.
यानंतर ज्या PNR साठी TDR दाखल करायचा आहे ते निवडा आणि नंतर फाइल TDR वर क्लिक करा.
आता TDR रिफंड मिळवण्यासाठी तिकिटाच्या तपशीलातून प्रवाशाचे नाव निवडा.
यानंतर पुढे दिलेल्या लिस्टमधून TDR दाखल करण्याचे कारण निवडा किंवा दुसरे कारण टाकण्यासाठी “Other” वर क्लिक करा.
आता सबमिट बटणावर क्लिक करा.
जर आपण “Other” पर्याय निवडला असेल तर टेक्स्ट बॉक्स उघडेल.
यानंतर रिफंडचे कारण लिहून ते सबमिट करा.
TDR दाखल करताना कन्फर्मेशन दिसेल.
सर्व तपशील बरोबर असताना OK वर क्लिक करा.
TDR एंट्री कन्फर्मेशन पेज PNR नंबर, ट्रान्सझॅक्शन आयडी, रेफरेंस नंबर, टीडीआर स्टेटस आणि कारण दाखवेल. Train Ticket Refund
I-ticket असल्यास ऑनलाइन TDR भरता येणार नाही
हे लक्षात घ्या कि, I-ticket चे ऑनलाइन बुकिंग केले जाऊ शकते, मात्र हे तिकीट कागदाच्या (हार्डकॉपी) स्वरूपात उपलब्ध असते. -ticket हे कुरिअर किंवा पोस्टद्वारे मिळते. ज्यामुळे त्याचा ऑनलाइन रिफंड घेता येत नाही. यासाठी प्रवाशाला स्टेशन मास्टरकडे आय-तिकीट जमा करून TDR घ्यावा लागेल. या नंतर ते पूर्णपणे भरून GGM (IT), Indian Railway Catering and Tourism Corporation Limited, 1st Floor, Internet Ticket Centre, IRCA बिल्डिंग, स्टेट एंट्री रोड, नवी दिल्ली 110055 येथे पाठवावे लागेल. Train Ticket Refund
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! आता बँकेकड्न कर्ज घेणे महागले
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 271 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे नवीन भाव
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ 5 कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दिला 2,481% पर्यंत रिटर्न
AU Small Finance Bank : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या व्याजदरात केली वाढ