सांगली प्रतिनिधी । मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय येथे मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाटन महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. याठिकाणी मुलीना स्वसंरक्षनाचे दिले धडे दिले जाणार आहेत.
मुलींना शिक्षणातूनच स्वसंरक्षनाचे धडे देणारा उपक्रम करणारी जिल्हयातील पहिलीच शाळा आहे. मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मध्ये जागतिक महिला दिना निमित्त मुलींना आत्मसंरक्षण करण्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. याचे उद्घाटन महापौर गीता सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमनताई खाडे ,नगरसेविका अनिता व्हनखंडे,संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे,मुख्याध्यापिका प्राजक्ता यादव, या उपस्थित होत्या.
देशामध्ये सुरू असलेल्या महिलांच्या संबंधित घटनांवर एक उपाय म्हनून मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालय मध्ये पाहिली ते आठवी मधील मुलींना मार्शल आर्ट कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुली १० वीला जाईपर्यंत त्यांना ब्लॅक बेल्ट मिळेल असा प्रयत्न या शाळेचा आहे. त्यामुळे मुलींना स्वसंरक्षणाचे धडे सुरू केले आहे. मुलींना शिक्षणातूनच स्वसंरक्षनाचे धडे देणारा उपक्रम करणारी जिल्हयातील ही पहिलीच शाळा आहे.