TRAI ची DND सर्व्हिस कुचकामी असल्याचे सिद्ध होत आहे, DND असूनही 75 टक्के लोकांना येत आहेत नको असलेले SMS

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । TRAI ची महत्वाकांक्षी DND सर्व्हिस मागे पडत असल्याचे सिद्ध होत आहे. ही सुविधा घेतल्यानंतरही लोकांना नको असलेले मेसेजेस येतच आहेत. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 74 टक्के लोकांनी ‘डू नॉट डिस्टर्ब’ या लिस्ट मध्ये असूनही त्यांना SMS मिळत असल्याचे सांगितले. ऑनलाईन प्लॅटफॉर्म ‘लोकलसर्कल्स’ ने रविवारी या संदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला.

त्याच वेळी, 26 टक्के लोकं म्हणाले की,” सुमारे 25 टक्के नको असलेले SMS मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडर द्वारे पाठविले जातात. बँकिंग, विमा, रिअल इस्टेट, स्थानिक सेवा आणि पैसे कमविण्याच्या ऑफर स्पॅम SMS चे मुख्य योगदानकर्ते आहेत.

देशातील 324 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण
‘डू नॉट डिस्टर्ब’ लिस्ट युझर्सना त्रासदायक कॉल किंवा मेसेजेस पासून वाचवण्यासाठी आहे. या सर्वेक्षणात देशातील 324 जिल्ह्यांतील 35,000 लोकांचा समावेश होता. यामध्ये असे आढळले आहे की, 73 टक्के लोकांना दररोज चार किंवा त्याहून अधिक नको असलेले SMS येत आहेत. यापूर्वी नुकतेच दूरसंचार विभागाने कॉल करणार्‍यांना दंड आकारण्याचे नियम कठोर केले आहेत.

दूरसंचार संसाधने किंवा सेवांचा वापर करून फसवणूक झाल्यास कायद्याने अंमलबजावणी संस्था, वित्तीय संस्था आणि इतर सरकारी संस्था यांच्याशी समन्वय साधण्यासाठी विभागाने दोन विशेष युनिट्सची स्थापना केली आहे. यामध्ये डिजिटल इंटेलिजेंस युनिट (DIU) आणिटेलीकॉम एनलिटिक्स फोर फ्रॉड मैनेजमेंट एंड कंज्यूमर प्रोटेक्शन (TAFCOP) चा समावेश आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) त्रास देणार्‍या कॉलशी संबंधित नियमांचे व्यवस्थापन करते. यामध्ये त्रास देणार्‍या कॉल करणाऱ्यास प्रति उल्लंघन केल्याबद्दल एक हजार ते दहा हजार रुपये दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तथापि, TRAI चे हे सर्व उपाय कुचकामी दिसत आहेत. मोबाइल सेवेसंदर्भातील इतर सेवांबाबतही ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषत: मोठ्या संख्येने ग्राहक इंटरनेट डेटा वापराबद्दल काळजीत आहेत. बहुतेक लोकं तक्रार करतात की, त्यांचा डेटा पॅक खूप लवकर संपत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment