हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईसह राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने विविध मागण्यासाठी आक्रमक पावित्रा घेत आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज माझी भेट घेतली. यावेळी विलीनीकरणाची मागणी अतिशय आग्रही होती. मात्र, विलीनीकरणाची मागणी कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही. जोपर्यंत न्यायालयाच्या कमिटीचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणार नसल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत पार पडलेल्या बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परब म्हणाले की, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी शिष्टमंडळाने प्रमुख दोन मागण्या मांडल्या आहेत. एक विलीनीकरणाची मागणी त्यांनी मंडळी ती आग्रही होती. ती आम्ही मान्य करणार नसल्याचे असल्याचे सांगितले. तसेच दुसरी मागणी अशी कि बारा आठवडे कालावधी कमी करा अशी होती. त्याबाबत कमिटीकडून जो अहवाल येईल त्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत.
आज झालेल्या शिष्टमंडळाच्या बैठकीत आम्ही एसटीचा तोटा, उत्पन्न भरून काढण्यासाठी काय करावे लागणार आहे. याबाबत चर्चा केली आहे. कर्मचाऱ्याच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या दोन मागण्यांबाबत आम्ही सकारात्मकता दर्शवली आहे. कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत न्यायालयाकडून निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्वरूपाचा निर्णय घेऊ नये. सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपला संप मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर शिष्टमंडळाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले आहे.