पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रेव्हल्सचा टायर फुटल्यानं मोठा अपघात; स्विफ्ट कार 200 फूट उडाली..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड : पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ ट्रेव्हल्स आणि स्विफ्ट कारचा मोठा अपघात झाला आहे. ट्रेव्हल्सचा टायर फुटून झालेल्या अपघाताने स्विफ्ट कार जवळजवळ २०० फूट दूर उडाली आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, किरण निसरेकर (वय 28) राहणार गडहिंग्लज हे स्विफ्ट कारने (MH09 DM 3426) कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. कराड शहराजवळील नांदलापूर नजीक साईवीरभद्र ट्रेव्हल्सचा (MH17 BD7776) टायर फुटला. यानंतर ट्रेव्हल्सच्या ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यानं ट्रेव्लस दुभाजकाला धडकून सैरभैर झाली. याचवेळी मागून येणार्या स्विफ्ट कारला ट्रेव्हल्सने जोरदार धडक दिली.

ट्रेव्हल्सने दिलेली धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे स्विफ्ट कार जवळजवळ २०० फूट दूर उडाली. स्विफ्टमधील ड्रायव्हरने हेन्डब्रेक दाबून गाडी वेळेत कंट्रोल केल्याने गाडी पलटी झाली नाही. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, एसटी संपामुळे ट्रेव्हल्सचा धंदा सध्या जोरदार सुरु आहे. अधिक नफा कमावनण्याच्या प्रयत्नात खाजगी ट्रेव्हल्स कंपन्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालून वाहने चालवत आहेत. एस.टी. संपापासून अपघातांत वाढ झाली आहे.

शासनाने एस.टी. महामंडळाचे शासनात विलगीकरण करुन एस.टी. कामगारांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा खाजगी ट्रेव्हल्स कंपन्या अधिक नफा कमावण्यासाठी वेगाने गाड्या चालवणार आणि अपघातांत अशीच वाढ होणार ही काळ्या दहडावरची रेघ आहे.