Insurance Knowledge : प्रत्येक परिवाराने घरातील सर्व व्यक्तींचे हेल्थ पॉलिसी काढणे गरजेचे असते असे तुम्ही अनेक वेळा ऐकले असेल. याचा फायदा तुम्हाला दवाखान्यात उपचार घेताना होत असतो. यामुळे तुमच्यावर आर्थिक संकट येत नाही. मात्र अनेकवेळा उपचाराच्या वेळी खिशातून पैसे द्यावे लागत असतात. ही समस्या का निर्माण होते हे तुम्ही जाणून घ्या.
तसे पाहिले तर आरोग्य पॉलिसीधारकांना फायदा असा आहे की त्यांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागत नाहीत किंवा झालेल्या खर्चाचा दावा करण्यासाठी त्यांना कोणतीही कागदपत्रे करावी लागत नाहीत. त्यांना फक्त त्यांचे कार्ड द्यावे लागते आणि उपचार सुरू होतात.
तसेच विमा कंपनी आणि रुग्णालय संयुक्तपणे उपचाराचा खर्च ठरवतात आणि रुग्णाच्या उपचारावर खर्च केलेले पैसे कंपनी रुग्णालयाला देते. परंतु, काही प्रकरणांमध्ये, तुमच्याकडे आरोग्य पॉलिसी असली तरीही, तुम्हाला प्रथम तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागतात. असे का होत असते हे समजून घ्या.
दरम्यान, तुम्हाला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की कॅशलेस सुविधा फक्त विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, जर तुम्ही अचानक आजारी पडला आणि तत्काळ उपचाराची गरज भासली, तर अशा परिस्थितीत तुम्हाला उपचाराचा खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागू शकतो. कारण हॉस्पिटल येथे कॅशलेस सुविधा देण्यास नकार देऊ शकते.
आपत्कालीन परिस्थितीत सुविधा उपलब्ध होणार नाही
एका अहवालानुसार आपत्कालीन परिस्थितीत, विमाधारकाला विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्येही उपचार घ्यावे लागले, तर तो कॅशलेस सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. त्याला त्याच्या खिशातून पैसे द्यावे लागतील आणि नंतर परतफेड करावी लागेल. कारण नेटवर्क रुग्णालयांमध्ये कॅशलेस दाव्यांसाठी प्री-ऑथोराइजेशन आवश्यक आहे. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत प्री-ऑथोराइजेशन मिळण्यास वेळ नसतो. कारण लवकरात लवकर उपचार सुरु करायचे असतात.
सामान्य परिस्थितीत, जेव्हा तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाता तेव्हा तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमधील प्रवेश, उपचार आणि खर्चाची माहिती तेथील विमा डेस्कद्वारे विमा कंपनीला देता. विमा कंपनी या कागदपत्रांचे आणि तुमच्या उपचारांशी संबंधित माहितीचे मूल्यांकन करते आणि प्री-ऑथोराइजेशन देते. यानंतर हॉस्पिटल तुमच्यावर उपचार सुरू करते.
प्री-ऑथोराइजेशन वेळ लागतो
त्याचबरोबर अचानक आजारी पडल्यास त्वरित उपचार आवश्यक असतात. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये प्री-ऑथोराइजेशन घेण्यासाठी वेळ नाही कारण विमा कंपनीला प्री-ऑथोराइजेशन प्रक्रियेसाठी सहसा 6 ते 24 तास लागतात. अशा वेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी वेळ वाया घालवणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधीतांना स्वत:च्या खिशातून पैसे भरून उपचार घ्यावे लागतात. मात्र हेल्थ पॉलिसी तुम्हाला ते पैसे परत करते व तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्हाला वाचवते.