सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
मनाली येथे प्रशिक्षणासाठी गेलेल्या साताऱ्यातील ट्रेकर्सच्या ट्रॅव्हलला अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅव्हल्स मधील ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. या ट्रव्हल्समध्ये 51 जण होते. दोन ट्रव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये चालकासह अन्य 6 जण जखमी झाले आहेत.
मनाली येथून मिळालेली माहिती अशी, हिमाचल प्रदेशाातील मंडी येथे दोन ट्रव्हल्सचा अपघात झाला आहे. यामध्ये प्रशिक्षणासाठी साताऱ्यातील शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे 6 सदस्य आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे 6 सदस्य असे जिल्ह्यातील 12 जण होते. तर इतर ठिकाणचे मिळून एकूण 50 ट्रेकर्स ट्रेनिंगला गेले होते. त्याच्यासोबत एक ड्रायव्ह असे एकूण ट्रव्हल्समध्ये 51 जण होते. सध्या सर्वजण सुखरूप असल्याचे समजत आहे.
सातारा जिल्हा परिषद यांच्या मार्फत अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट यांच्या ट्रेनिंगसाठी 50 जण या ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले होते. चार आठवड्यांचे ट्रेनिंग संपल्यानंतर माघारी येत असताना दुसऱ्या ट्रॅव्हल्सने साताऱ्यातील ट्रॅव्हल्सला समोरून धडक दिल्याने चालक गंभीररीत्या जखमी झाला आहे. तर इतर 5 ते 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या चालकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.