दुर्दैवी ! 4 अल्पवयीन मुलांसह 7 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रविवारी मावळमध्ये इंद्रायणी नदीत गोधडी धुवायला गेलेल्या मायलेकाचा बुडून (drown) मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता आणखी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण 7 जणांचा पाण्यात बुडून (drown) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या 7 जणांपैकी 4 जण अल्पवयीन आहेत. हि घटना रविवारी तामिळनाडूच्या गेडीलाम नदीत घडली आहे.

काय घडले नेमके ?
तामिळनाडूच्या गेडीलाम नदीत काही बुडत (drown) असल्याचे समजताच त्यांना वाचवायला काही जण गेले असता त्यांचादेखील पाण्यात बुडून (drown) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

कुठे घडली घटना?
तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील पनरुट्टीजवळ असलेल्या किलारुंगुनाम या गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये सात जणाांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या भागात असलेल्या गेडीलाम नदीत ही दुर्दैवी घटना घडली आहे.

पाच लाखांची मदत जाहीर
या दुर्दैवी घटनेबद्दल तामिळनाडू राज्याचे राज्यपाल आरएन रवी यांनी खेद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना तातडीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री पब्लिक रिलिफ फंडातून ही मदत देण्यात येणार आहे.

हे पण वाचा :
भंडाऱ्यात बर्निंग ट्रकचा थरार, भयानक कारण आले समोर

रस्त्यावरील वळण न दिसल्याने मोटरसायकलचा अपघात; 3 ठार 1 जखमी

दुर्दैवी ! इंद्रायणी नदीत पाण्यात बुडून माय-लेकांचा मृत्यू

अनवाणी पायाने आगीवर धावताना दिसली मुले, धक्कादायक Video आला समोर

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Leave a Comment