सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे नवे 2 हजार 502 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्हचा दर वाढलेला असताना त्याचबरोबर मृत्यदरही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेवरील वाढणारा ताण कमी करण्यासाठी सातारा येथे जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उद्यापासून (दि.4 मे) जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हॅलो महाराष्ट्राला माहिती दिली आहे.
सातारा येथे शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाप्रशासनाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आ. शशिकांत शिंदे, प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अंचल दलाल यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊन लावलेला आहे. मात्र तरीही कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. तेव्हा उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येणार आहे. त्यासंबधी पोलिस यंत्रणा, मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्याकाळी नियमावली जाहीर करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश जारी केला आहे. उद्या सात वाजल्यापासून ते 10 मे रोजी चे चोवीस वाजेपर्यंत आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्व किराणामाल भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी) पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद असणार आहेत. तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी 11 या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाची संबंधित दुकाने सकाळी सात ते सकाळी 11 या कालावधीत चालू राहतील या दुकानातून घरपोच सेवा सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत चालू ठेवण्यास परवानगी असेल.
हॉटेल रेस्टॉरंट रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12 ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. घरपोच मद्य विक्री बाबत दुपारी बारा ते सायंकाळी पाच असा वेळेत बदल करण्यात आला असून याही ठिकाणी पार्सल सेवा सुरू राहणार आहे.(
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? Click Here to JOIN Our Whatsapp Group
सातारा जिल्ह्यासह राज्यातील ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/photos/a.111396531014935/129898269164761/