रोप-वे तुटल्याने मोठी दुर्घटना!! 12 जखमी तर 50 हुन अद्याप अडकलेले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वतावरील रोप-वे अचानक तुटल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही 50 लोक अडकल्याची भीती आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीम बचाव कार्य करत आहे. या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण असून अद्यापही अनेक लोक बेपत्ता आहेत.

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पूजा करण्यासाठी आणि फिरण्यासाठी शेकडो पर्यटक येथे दाखल झाले होते. रोपवे अपघातात 19 ट्रॉलींमध्ये 50 हुन अधिक लोक अडकले आहेत, ज्यांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीम प्रयत्न करत आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली होती. रोपवे दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देवघरचे उपायुक्त मजुनाथ भजंत्रीही घटनास्थळी पोहोचले आहेत. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ आणि स्थानिक लोक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. या रोप वेमध्ये एकूण 19 केबिन असून दुपारी तो चालवताच त्याच्या दोरीच्या वरच्या भागाचा रस तुटला.

अमित कुमार, खुशबू कुमारी, जया कुमारी, छठी लाल शाह, ड्युटी राम, वीर कुमार, नमन, अभिषेक, भागलपूरचे धीरज, कौशल्या देवी, अन्नू कुमारी, तनु कुमारी, डिंपल कुमार आणि चालक अशी या दुर्घटनेत अडकलेल्यांची नावे आहेत.

Leave a Comment