हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या भारतात अनेक ठिकाणे असे आहेत जिथे निसर्ग सौंदर्य हे डोळ्याचे पारणे फेडतात. अश्या ठिकाणी आपल्या पार्टनर सोबत तसेच कुटुंबासोबत जाण्याची मजाच काही और असते. परंतु अडचण निर्मणा होते ते बजेटची. असेच निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला प्रदेश म्हणजे अंदमान – निकोबार (Andaman-Nicobar) . या ठिकाणी जाण्याचा तुम्ही प्लॅन करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च लागत नाही. तुम्ही अवघ्या 20 हजार रुपयात अंदमान – निकोबार ची सफर करू शकता आणि नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता.
अंदमान – निकोबार बेट हे अतिशय निसर्गरम्य असून दरवर्षी लाखो पर्यटक त्याठिकाणी फिरायला जात असतात. तुम्ही जर दिल्ली वरून जाणार असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती जास्तीत जास्त 20 ते 25 हजार रुपये खर्च येईल. या पैशात तुम्ही ३ ते 4 दिवस त्याठिकाणी आरामात राहू शकता. तुम्ही अगदी कमी बजेट मध्ये क्षद्विपसह अंदमान आणि निकोबारचा आंनद घेऊ शकता आणि सुट्ट्या एन्जॉय करू शकता. तुम्हाला जर लांबचा प्रवास करून पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर अंदमान निकोबार बेस्ट पर्याय ठरेल.
काय आहे येथील विशेषता?
लक्षद्वीप तसेच अंदमान – निकोबार हे बेट निसर्गाने नटलेले आहे. हे आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र येथील विशेषता नेमकी काय आहे हे अनेकांना माहिती नाही. येथे आल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा एक वेगळाच अनुभव पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला बंगाराम बेट, मिनिकॉय बेट, अगत्ती बेट, कावरत्ती बेट, कल्पेनी बेट हे लक्षद्विप मध्ये पाहायला मिळेल. तर अंदमान आणि निकोबारच्या आसपास तुम्ही नील बेट, रॉस आयलंड तसेच जॉली बॉय बेटे देखील या सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात. अत्यंत कमी बजेट मध्ये या ठिकाणचा आनंद तुम्ही घेऊ शकता.