ब्रेकिंग | तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | ऐतिहासिक असे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेने मंजूर केले आहे. या विधेयकाला सभागृहात उपस्थित असणाऱ्या खासदारांनी मतदान केले. हे विधेयक राज्यसभेत ९९ विरुद्ध ८४ आशा फरकाने मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्याने या विधेयकाने मोठा प्रवास पार केला आहे. याच प्रमाणे काँग्रेसच्या सदस्यांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. त्या मागणीला १०० विरुद्ध ८४ या मतांच्या फरकाने फेटाळून लावले आहे.

या विधेयकाच्या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गैरहजर होते. त्याच प्रमाणे टीडीपी आणि बसपाचे सदस्य देखील गैरहजर होते. या विधयेकावर राज्यसभेत विस्ताराने चर्चा झाली आणि शेवटी हे विधेयक मंजूर केले. दरम्यान या विधेयकावर सरकारी पक्षाची बाजू मांडण्यासाठी उठलेल्या कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर या विधेयकाच्या निमित्ताने चांगलेच तोंडसुख घेतले.

गुरुवारी लोकसभेत हेच विधेयक ३०३ विरुद्ध ८२ मतांनी मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतर आता या विधेयकावर राज्यसभेत चर्चा होऊन हे विधेयक मंजूर झाल्याने आता राष्ट्रपतींच्या सहीने याचे कायद्यात रूपांतर होईल. तिहेरी तलाक विधेयकाचे भाजप समोर मोठे आव्हान होते. ते आव्हान भाजपने जिंकले आहे असे म्हणण्यास काहीच हरकत नाही.

Leave a Comment