हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास 100 टक्के निवडणूक लढवणार असं त्यांनी म्हंटल. तसेच घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशी ही लढत होऊ शकते असंही त्यांनी म्हंटल. एका वृत्तवाहिनीशी त्या बोलत होत्या.
तृप्ती देसाई म्हणाल्या, सध्या राज्यातल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचं काम ठिक सुरू आहे. खूप चांगलं काम चाललंय किंवा खूप वाईट काम सुरू आहे असं मी म्हणणार नाही.परंतु कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाने मला उमेदवारी दिली तर मी १०० टक्के बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढेन. अगदी भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाने मला विचारलं तर मी निवडणूक लढेनच असं त्यांनी म्हंटल तसेच आम आदमी पक्षाने तर आपल्याला ऑफर सुद्धा दिली आहे असं त्यांनी म्हंटल.
आम आदमी पार्टीने मला पक्ष प्रवेशाची ऑफर दिली आहे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊ असाही निरोप मला आला आहे. याशिवाय अजून काही पक्षांकडून मला ऑफर आली आहे. परंतु मी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विचार घेऊनच पुढचा निर्णय घेणार आहे. आगामी काळात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशीच निवडणूक होऊ शकते असेही तृप्ती देसाई यांनी म्हंटल.