इंदापूरमध्ये गावकऱ्यांनी संतापाच्या भरात डंपर पेटवला, नेमके काय घडले ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदापूर : हॅलो महाराष्ट्र – इंदापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये डंपरने मोटारसायकलला जोराची धडक (accident) दिली. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये एका शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना (accident) इंदापूर येथील काटी गावामध्ये घडली आहे. या अपघातात मृत मुलीचे चुलते आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ज्यावेळी हा अपघात (accident) झाला त्यावेळी घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्णाण झाले होते. यावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी रागाच्या भरात डंपर पेटवून दिला.

चुलते आणि भाऊ गंभीर जखमी
इंदापूर तालुक्यातील काटी या गावामध्ये हा अपघात (accident) घडला आहे. काटी गावातील काटेश्वर विद्यालयात इयत्ता सातवी मध्ये शिकत असलेल्या शाळकरी मुलीला खडी ने भरलेल्या टीपरने चिरडले. ज्यावेळी हा अपघात (accident) झाला त्यावेळी मृत मुलगी तिच्या चुलत्यासोबत शाळेत जात होती. डंपरने इतक्या जोरात धडक दिली की, मुलीचा चुलता देखील या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याचबरोबर मुलीचा भाऊ देखील गंभीर जखमी झाला. भावावरती आणि चुलत्यांवरती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

जमावाकडून डंपर पेटवण्यात आला
या अपघातात (accident) मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच घटनास्थळी लोकांची गर्दी निर्माण झाली. यानंतर डंपर चालकाने घटनास्थवरून पळ काढला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने संतापाच्या भरात डंपर पेटवून दिला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित डंपर चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर